स्टार प्रवाहवरील सर्वच मालिका या घराघरात लोकप्रिय ठरत आहे. यातील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका कायमच प्रेक्षकांमध्ये चर्चेता विषय ठरताना दिसते. ही मालिका टीआरपीच्या यादीत कायमच टॉपला असल्याचे पाहायला मिळते. मात्र आता या मालिकेत एक नवा ट्वीस्ट येणार आहे. नुकतंच याचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोतून अभिषेकचे विवाहबाह्य संबंध अरुंधतीसमोर उघड होणार आहेत.
‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अरुंधती आणि आशुतोष एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याची स्वप्न पाहत आहेत. अनुष्काच्या येण्याने त्यांच्या नात्यात दुरावा येईल असं म्हटलं जात होतं पण या उलट घडताना दिसत आहे. अरुंधती आशुतोषला तिच्या प्रेमाची कबुली द्यायला तयार झाली आहे. पण आता या कथानकात एक वेगळाच ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे.
आणखी वाचा : “ड्रग्ज ॲडिक्ट पण मीच…” ‘आई कुठे काय करते’मधील ‘अनिरुद्ध’च्या पोस्टने वेधले लक्ष
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोनुसार, अरुंधती आणि आशुतोष लग्नाबद्दल बोलण्यासाठी एका कॅफेमध्ये बसल्याचे दिसत आहे. यावेळी आशुतोष काही बोलणार इतक्यात तिथे अभिषेक एका मुलीबरोबर येतो. त्यावेळी अभिषेक हा त्या मुलीच्या हातात हात घालून कॅफेमध्ये येताना अरुंधती पाहते. यावेळी अभिषेक हा त्या मुलीच्या हातावर किस करतो. हे सर्व अरुंधती पाहते आणि तिला जबरदस्त मोठा धक्का बसतो.
आणखी वाचा : “कशाला पाहिजे टिकली फिकली…” मराठी अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत
अभिषेकचे विवाहबाह्य संबंध आहेत, हे अरुंधतीसमोर उघड होणार आहेत. अभिषेक त्या मुलीसाठी अनघाची फसवणूक करत आहे. शेवटी तोदेखील अनिरुध्दच्याच मार्गाने जाताना दाखवण्यात येणार आहे. आता अभिषेकला दुसऱ्या मुलीसोबत पाहून अरुंधती काय निर्णय घेणार? ती घरी जाऊन सगळं सांगणार की अभिषेकला समजावण्याचा प्रयत्न करणार? अनघा गरोदर असताना अभिषेक तिची फसवणूक करतोय हे अरुंधतीला सहन होणार का? हे सर्व पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विशेष म्हणजे आशुतोष आणि अरुंधतीच्या लग्नावर याचा काय परिणाम होणार हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आता या मालिकेत रंजक वाढत जाणार आहे.