‘माझी तुझी रेशीगाठ’ मालिकेतून घराघरात पोचलेली अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियाद्वारे ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तिने हिंदी आणि मराठी अशा दोन्हीभाषांमध्ये काम केले आहे. सध्या तिचं ‘नेहा’ हे पात्र चांगलेच गाजते आहे. नुकतीच ती झी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात येऊन गेली आहे. या कार्यक्रमात तिने आपल्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
या कार्यक्रमात तिने आपल्या विचित्र हसण्याबद्दलचा किस्सा सांगितला आहे. ती अस म्हणाली की ‘माझ्या पहिल्या चित्रपटाच्या सेटवर एका सहाय्यक दिग्दर्शकाने मला अस सांगितले की मॅडम तुम्ही खूप छान दिसत मात्र तितक्याच घाण हसता’, तिने हे सांगताच कार्यक्रमातील प्रेक्षक, सूत्रसंचालक सुबोध भावे मनमुरादपणे हसले. स्वतः प्रार्थना बेहरे हा किस्सा सांगताना हसत होती.
“मला कायमच वजन… ” सोनाक्षी सिन्हाने व्यक्त केली खंत
झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत साई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, श्रेया बुगडे यांसारख्या मराठीलय आघाडीच्या अभिनेत्री येऊन गेल्या आहेत. तसेच पंकजा ,मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, अमृता फडणवीस यांच्यासारख्या राजकारणात सक्रिय असलेल्या महिलादेखील येऊन गेल्या आहेत.
प्रार्थनाने ‘मितवा’ चित्रपटातून मराठी चित्रपसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘ती अँड ती’, ‘फुगे’, ‘लव्ह यू जिंदगी’ हे चित्रपट केले होते. प्रार्थना मूळची बडोद्याची आहे, अभिनयात करियर करण्यासाठी तिने मुंबई गाठली. एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.