झी मराठीवरील मन झालं बाजींद ही मालिका कायमच चर्चेत असते. या लोकप्रिय मालिकेत फुई आजी ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कल्पना सारंग यांच्या पतीचे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कल्पना सारंग यांचे पती रमेश जयराम सारंग यांचे १२ मे २०२३ रोजी निधन झाले आहे. ते ७७ वर्षांचे होते. कल्पना सारंग यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी त्यांच्या पतीचा एक फोटो पोस्ट करत याबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : अभिज्ञा भावेपाठोपाठ आणखी एका मराठी अभिनेत्रीचा इन्फ्लुएन्सरवर संताप, म्हणाली “फक्त लोकप्रिय चेहरा…”
“रमेश जयराम सारंग, भावपूर्ण श्रद्धांजलि 13 जून 1946- 12 मे 2023” असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिले आहे.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेची पत्नी ‘या’ क्षेत्रात करते काम, जाणून घ्या तिच्याबद्दल…
कल्पना सारंग यांनी ही बातमी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेक कलाकारांनी यावर कमेंट केल्या आहेत. त्यांचे अनेक सहकलाकार यावर कमेंट करत रमेश सारंग यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. मन झालं बाजींद मालिकेतील वैभव चव्हाणने “काळजी घे फुई” अशी कमेंट केली आहे. तर अभिनेत्री श्वेता खरात हिने कमेंट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.