Sukh Mhanje Nakki Kay Asta : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका गेल्या चार वर्षांपासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे. मालिकेत आजवर अनेक ट्विस्ट आणि मोठे बदल घडले आहेत. जयदीप आणि गौरी दोघांची हत्या, त्यानंतर त्यांचा पुनर्जन्म अशा अनेक गोष्टी मालिकेत घडल्या आहेत. सध्या मालिकेत शालिनी सतत नित्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतेय. मात्र, यावेळी नित्या आणि अधिराज दोघे मिळून शालिनीला मृत्यूच्या दारात उभं करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशात नुकताच या मालिकेचा एक नवा प्रोमो समोर आला आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत शालिनीच्या पायातील सुरक्षाबंध नित्या आणि अधिराजने प्लॅन करून काढून घेतलं आहे, त्यामुळे शालिनीचा मृत्यू अटळ झाला आहे. आता स्वत:चा जीव वाचवण्यासाठी शालिनी काहीही करण्यास तयार झालीये. एकीकडे शालिनीविरोधात तयारी सुरू असताना दुसरीकडे नित्या आणि अधिराज पुन्हा एकदा आई-बाबा होणार अशी गोड बातमी मिळाली आहे. ही गोड बातमी मिळाल्याने प्रेक्षक आनंदात होते. मात्र, आता मालिकेत शालिनी नित्याची हत्या करणार, असा एक प्रोमो समोर आला आहे.

Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Shukra Budh Labh Yog
चार दिवसानंतर अचानक पलटणार या ३ राशींचे नशीब, शुक्र-बुधच्या लाभ दृष्टीचा दुर्मिळ योग
Fire at birthday party girl shocking video viral on social media
केकवर मेणबत्ती लावली अन् होत्याचं नव्हतं झालं; वाढदिवस साजरा करताना तुम्हीही ‘ही’ चूक करता का? मग हा VIDEO नक्की पाहा
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर

हेही वाचा : Bigg Boss 18: सातव्या आठवड्यात घराबाहेर झालेल्या सदस्याचं नाव आलं समोर, टॉप-२मध्ये असण्याची ‘बिग बॉस’ने केली होती भविष्यवाणी

शालिनीने याआधी गौरीची हत्या केली होती. नित्या म्हणजे गौरीचा पुनर्जन्म, मात्र आतादेखील शालिनी तिची हत्या करते, असं प्रोमोमध्ये दिसत आहे. मालिकेच्या एका फॅनपेजवर शेअर केलेल्या प्रोमो व्हिडीओमध्ये दिसत आहे की, शालिनी नित्याजवळ येते आणि म्हणते, “मी तुला एक ऑफर द्यायला आले आहे.” त्यावर “कसली ऑफर”, असं नित्या विचारते. नित्याच्या या प्रश्नावर शालिनी थेट तिच्या हातातला एक बरीक चाकू तिला दाखवते आणि म्हणते, “मला तुझं बाळ दे.” असं म्हणत शालिनी थेट नित्याच्या पोटात चाकू खुपसताना दिसत आहे.

मालिकेतला हा प्रोमो प्रेक्षकांना आवडलेला नाही. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलं की, “बस ना आता, मालिका संपणार आहे पुढच्या महिन्यात; आता तरी चांगलं दाखवलं पाहिजे.” तसेच अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर पाणावलेल्या डोळ्यांचे इमोजी पोस्ट केले आहेत.

हेही वाचा: भुवनेश्वरी की चारुलता? भर मांडवात अक्षरा लग्न थांबवणार; अधिपतीच्या डोक्यावर हात ठेवून…; पाहा मालिकेचा प्रोमो

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेवर याआधीही प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. मालिकेत येणारे ट्विस्ट अनेक प्रेक्षकांना न आवडल्याने मालिका बंद करा, असंही एका नेटकऱ्याने याआधी म्हटलं आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत आता नित्याला मारल्याचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय, त्यामुळे मालिकेत खरोखर नित्याची हत्या होणार का, हे मालिकेच्या पुढील भागातच समजेल.

Story img Loader