Sukh Mhanje Nakki Kay Asta : मालिका किंवा चित्रपटांमध्ये अनेकदा काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटना घडतात. खलनायक नेहमी विविध कट रचतात आणि चुका करतात, त्यावर त्यांना शिक्षा दिली जाते. त्यात कधी अपघात, तर कधी स्वत:हून अगदी कठोर शिक्षा दिल्याचं दाखवलं जातं. असे सीन पाहताना प्रत्येकाच्या अंगावर शहारे येतात. अशात ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतदेखील असाच एक सीन पाहायला मिळाला. त्यामध्ये शालिनीला मृत्यूच्या दारात उभं करण्यात आलं. हा सीन नेमका कसा शूट करण्यात आला त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत सध्या शालिनीला वेड लागलं आहे. शालिनीला जयदीप आणि गौरी असताना तिनं केलेल्या गोष्टी आठवू लागल्या आहेत. तिला वेड लागण्याचं कारण म्हणजे, नित्यानं तिला अद्दल घडवण्यासाठी केलेला प्रयत्न. मालिकेत नित्या शालिनीनं तिच्या सर्व गुन्ह्यांची कबुली द्यावी म्हणून एक प्लॅन करते. ती शालिनीला शिर्के पाटील यांच्या जुन्या वाड्यात बोलावते.

Sukh Mhanje Nakki Kay Asta fame Aparna Gokhale appear in savali hoin sukhachi serial
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्री झळकणार आता नव्या भूमिकेत, पोस्ट करत म्हणाली, “माझी नवी मालिका…”
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Marathi actor Mahesh Kothare Dance in sukh mhanje nakki kay asta serial success party
Video: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या सक्सेस पार्टीत महेश कोठारेंचा ‘झपाटलेला’ चित्रपटातील गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
Video a brother cried for a bride sister on a wedding day
या दिवशी प्रत्येक भाऊ रडतो! बहिणीजवळ ढसा ढसा रडला; VIDEO पाहून व्हाल भावुक
While impressing the girl he fell on the stage
‘म्हणून मुलीला कधी इम्प्रेस करायला जाऊ नका…’ मुलीला इम्प्रेस करता करता स्वतःच आपटला; VIDEO पाहून पोट धरून हसाल
Madhavi Nimkar
“मी इथे…”, माधवी निमकरने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या सेटवरील दाखवली आवडती जागा; भावुक होत म्हणाली…
singer kartiki gaikwad share special post for sukh mhanje nakki kay asta serial
लवकरच बंद होणाऱ्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं कार्तिकी गायकवाडशी आहे खास कनेक्शन, गायिका पोस्ट करत म्हणाली….

हेही वाचा : आता होऊ दे धिंगाणा ३ : अनिरुद्ध अन् संजनामध्ये रंगणार भन्नाट अतरंगी टास्क; कलाकारांची होणार धावपळ अन्…; पाहा प्रोमो

तिथे शालिनी आल्यावर तिला बेशुद्ध केलं जातं. त्यानंतर तिला एका मोठ्या काचेच्या टाकीत हात-पाय बांधून ठेवलं जातं. शुद्ध आल्यावर तेथून बाहेर पडण्यासाठी ती फार धडपड करते. मात्र, नित्या, अधिराज व राजमा सर्व मिळून तिला तिच्या गुन्ह्यांची कबुली देण्यास सांगतात. त्यावेळी नित्याच्या सांगण्यावरून राजमा शालिनीला बंद केलेल्या टाकीत पाणी सोडतं. टाकीतलं पाणी वाढत जातं आणि शालिनी त्यात बुडत असते. जीव महत्त्वाचा असेल, तर तू गुन्हे कबूल कर, असं तिला नित्या सांगते.

शालिनीनं जयदीपलादेखील अशाच पद्धतीनं मारलेलं असतं. हे सर्व घडत असताना शालिनीला अचानक वेड लागतं आणि ती वेड्यासारखी वागू लागते. आता स्टार प्रवाह वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या सीनचा शूटिंगदरम्यानचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, शालिनी आरामात टाकीमध्ये बसली आहे. तसेच एक व्यक्ती कापडानं या टाकीच्या काचा पुसत आहे. शालिनी स्वत: टाकीतून उडी घेत बाहेर येते आणि पुन्हा आत जाते. तसेच आजूबाजूला मालिकेतील अन्य कलाकार आणि इतर स्टाफ काम करत आहेत. शालिनीला टाकीतून सहज बाहेर पडता यावं यासाठी तिथं एक मोठा स्टुलदेखील ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा : घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या रायने हटवलं ‘बच्चन’ आडनाव? दुबईतील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

मालिकेत शालिनी हे पात्र अभिनेत्री माधवी निमकर साकारत आहे. माधवीनंदेखील तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत “तुमचं काम तुम्हाला एक अर्थ आणि उद्देश देतो”, अशी कॅप्शन तिनं या व्हिडीओला दिली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Story img Loader