Marathi Serial Updates : छोट्या पडद्याची लोकप्रियता गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आघाडीच्या वाहिन्यांमध्ये टीआरपीसाठी चढाओढ चालू असल्याचं दर आठवड्याला पाहायला मिळतं. स्टार प्रवाह वाहिनी गेल्या काही वर्षांपासून टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये या वाहिनीवर अनेक नव्या मालिका चालू झाल्याचं पाहायला मिळालं. ‘स्टार प्रवाह’वर नुकत्याच चालू झालेल्या ‘थोडं तुझं थोडं माझं’ मालिकेतून ‘देवयानी’ फेम शिवानी सुर्वेने वाहिनीवर पुनरागमन केलं. अभिनेत्रीच्या पुनरागमनाची सध्या जोरदार चर्चा चालू असून तिच्या मालिकेला सुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शिवानी सुर्वे पाठोपाठ आता ‘देवयानी’ ( Marathi Serial ) मालिकेतील तिचा सहकलाकार संग्राम साळवी देखील स्टार प्रवाहच्या एका लोकप्रिय मालिकेत झळकणार आहे. याबद्दल जाणून घेऊयात…

zee marathi lakhat ek aamcha dada new actress entered in the show
सूर्याच्या घरात अचानक आलेली बाई कोण? मालिकेत नव्या अभिनेत्रीची एन्ट्री; यापूर्वी ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
marathi actress entered in the new serial of star pravah
आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…
kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
star pravah aboli serial new actress entry jahnavi killekar and mayuri wagh
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत २ नव्या अभिनेत्रींची एन्ट्री! जान्हवी किल्लेकरचा पहिला लूक आला समोर, तर दुसरी नायिका कोण?
tharla tar mag monika dabade baby shower ceremony
‘ठरलं तर मग’च्या सेटवर मोनिकाचं डोहाळेजेवण; मालिकेतील सर्व अभिनेत्री ऑफस्क्रीन आल्या एकत्र, पती उखाणा घेत म्हणाला…
Paaru
“तुम्ही पारूला सून म्हणून कधी स्वीकारणार आहात?”, श्रेया बुगडेच्या प्रश्नावर अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणाल्या…
priya bapat shares opinion on marathi industry
“क्षमता असूनही उमेशला मराठी सिनेमे ऑफर झाले नाहीत” प्रिया बापटने व्यक्त केली खंत; कलाकार म्हणून मांडलं प्रामाणिक मत

‘स्टार प्रवाह’च्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. ही मालिका मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता लवकरच या मालिकेत ‘देवयानी’ फेम प्रसिद्ध अभिनेता संग्राम साळवीची एन्ट्री होणार आहे. ‘देवयानी’ मालिकेमुळे संग्राम घराघरांत पोहोचला. “तुमच्यासाठी कायपण” हा त्याचा सुपरहिट संवाद आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. ‘देवयानी’ व ‘कुलस्वामिनी’ या ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत लक्षवेधी भूमिका साकारलेला संग्राम जवळपास ६ वर्षांनंतर आता पुन्हा एकदा वाहिनीवर पुनरागमन करणार आहे.

हेही वाचा : विकी कौशलसाठी ‘Bad Newz’; चित्रपटाने चौथ्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ कोटी, एकूण कलेक्शन किती?

नव्या मालिकेविषयी काय म्हणाला संग्राम ? ( Marathi Serial )

‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत होणाऱ्या एन्ट्रीविषयी सांगताना संग्राम म्हणाला, “स्टार प्रवाह कुटुंबाचा मी जुना सदस्य आहे. या कुटुंबासह पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळतेय याचा आनंद आहे. ‘देवयानी’ मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. आजही प्रेक्षक ‘देवयानी’ मालिकेत मी साकारलेल्या पात्राची प्रशंसा करतात. “तुमच्यासाठी कायपण” हा सुपरहिट डायलॉग बोलून दाखवण्याची मागणी करतात. इतक्या वर्षांनंतरही या पात्राविषयी असलेलं प्रेम पाहून मी भारावून जातो. ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत मी साकारत असलेलं पात्र देखील हटके आहे. खलनायक साकारतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खलनायक साकारताना एक कलाकार म्हणून नेहमी कस लागतो. भूमिकेतील बरेच बारकावे हळूहळू आत्मसात करतोय. मायबाप रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद अन् प्रेम या पात्रालाही मिळो हीच इच्छा व्यक्त करेन.”

sangram
संग्राम साळवी ( Marathi Serial )

दरम्यान, ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर वाहिनीवर प्रसारित करण्यात येते. यामध्ये अभिनेता विशाल निकम व अभिनेत्री पूजा बिरारी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

Story img Loader