आपल्या गोड आवाजाने कानांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे आर्या आंबेकर. ती कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. आर्या आंबेकरचा चाहता वर्ग फार मोठा आहे. नुकतंच तिने ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे.
आर्या आंबेकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने झी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या रिअॅलिटी शो कार्यक्रमाची एक खास आठवण सांगितली आहे. तिने तिचे काही फोटोही पोस्ट केले आहेत.
आणखी वाचा : मोठा स्विमिंगपूल, बेडरुमबाहेर निसर्गाचा नजारा अन्…; प्राजक्ता माळीच्या अलिशान फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का?
“२००८ मध्ये स्पर्धक असण्यापासून २०२१ मध्ये याच शोचे मार्गदर्शन करण्यापर्यंत आणि आता त्याच कार्यक्रमात पाहुणे म्हणून सहभागी होण्यापर्यंतचा प्रवास. झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ हे नेहमीच खास होतं आणि कायमच राहील”, असे आर्या आंबेकरने म्हटले आहे.
दरम्यान आर्याने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी भाषेतील अल्बम्समध्ये गाणी गायली आहे. त्याबरोबर तिने काही मराठी चित्रपटांसाठी आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत. गोड गळ्यासोबत आर्याच्या सौंदर्याने देखील अनेकांना भुरळ घातली आहे. २०१७ सालामध्ये आलेल्या ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून तिने अभिनय कारकिर्दीस सुरुवात केली.
तर दुसरीकडे ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ हा कार्यक्रम काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वामध्ये आर्या आंबेकर, रोहित राऊत, प्रथमेश लघाटे, कार्तिकी गायकवाड आणि मुग्धा वैशंपायन हे टॉप ५ स्पर्धक ठरले. आज हे पाचही जण संगीत क्षेत्रात चांगली कामगिरी करताना दिसत आहेत.