मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते हा सध्या खुपते तिथे गुप्ते या नव्या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. मराठीतील प्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक, दिग्दर्शक, निर्माता म्हणून त्याला ओळखले जाते. त्याने त्याच्या गाण्याने सिनेसृष्टीत एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. नुकतंच अवधूत गुप्तेने कॉलेजमधील प्रेमप्रकरणाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

अवधूत गुप्तेने नुकतंच मराठी किडा या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत अवधूतला त्याच्या लव्ह लाईफबद्दल प्रश्न विचारण्यात आला. “कॉलेजमध्ये कधी एखाद्या मुलीमुळे रडला आहेस का?” असा प्रश्न यावेळी अवधूतला विचारण्यात आला.
आणखी वाचा : Video : चांदीच्या ताटातील पक्वान्न, सुंदर उखाणा अन्… प्रथमेश लघाटेच्या पहिल्या केळवणाचा थाट पाहिलात का?

त्यावर अवधूतने ‘हो मग’ असे म्हणत सविस्तर उत्तर दिले. “तुम्ही आजकाल डेट करता. विविध डेटींग अॅप्स वापरता. मग तुम्ही खूप रिलेशनशिपमध्ये असता.

पण मला २७ वेळा पहिलं प्रेम झालं. असा मी सारखं सारखं प्रेमात नाही पडायचो. पण पहिलंच प्रेम २७ वेळा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मुलींबरोबर झालंय. त्यातील १२ वेळा तर रडलो असेन”, असे अवधूत गुप्तेने सांगितले.

आणखी वाचा : लेकाच्या हॉटेलमध्ये महेश मांजरेकरांनी स्वतः बनवलं जेवण, आकाश ठोसरने शेअर केला व्हिडीओ; म्हणाला, “सर्व पदार्थ….”

अवधूत गुप्तेचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी अवधूत गुप्तेने विविध राजकीय, समाजिक आणि खासगी विषयांवरही भाष्य केले.

Story img Loader