कलाकार मंडळी आणि ट्रोलिंग हे एक असं समीकरण जुळलं आहे; जे सातत्याने घडताना दिसतं. एखाद्या कलाकाराने चांगली पोस्ट केली तरी त्याला ट्रोल केलं जातं आणि चुकीची केली तरी त्याला ट्रोल केलं जातं. पण काही कलाकार या ट्रोलर्सना सडेतोड, चोख उत्तर देताना दिसतात. असंच काहीस गायिका जुईली जोगळेकरबरोबर घडलेलं पाहायला मिळालं.
जुईली जोगळेकरने गुढीपाडव्याच्या निमित्ताने चाहत्यांना शुभेच्छा देण्यासाठी एक पोस्ट केली होती. तिने नवरा, गायक रोहित राऊतसह फोटो शेअर करून लिहिलं होतं, “जुईली-रोहितचा पाडवा अपडेट. गुढी उभारणं, पुरणपोळी फस्त करणं, दुपारची झोप घेणं, तयार होऊन एक गोड सेल्फी काढणं आणि तो सेल्फी वेळेत पोस्ट करणं…तुम्हा सर्वांना आमच्याकडून शुभ पाडवा.”
हेही वाचा – एकेकाळी खोटे दागिने विकले, ऑफिस बॉयची केली नोकरी; १५व्या वर्षी ‘इतका’ होता अक्षय कुमारचा पगार
या फोटोमध्ये जुईली व रोहितचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळाला. पण हा फोटो पाहून कोणी जुईलीला म्हातारी म्हणालं, तर कोणी दातावरून हिणवलं. एवढंच नव्हे तर दोघं खास नाही दिसत असं देखील म्हटलं गेलं. पण या सगळ्यांना जुईलीने चांगलंच उत्तर दिलं. गायिकेच्या पोस्टवर एका नेटकऱ्याने लिहिलं, “हा फोटो काढल्याबद्दल धन्यवाद…आमचा जग्गा जेवत नाही तेव्हा हा फोटो दाखवतो मी…मग भूत आला भूत आला अशा भीतीने जेवतो…पण जग्गा आमचा कुत्रा आहे.” याच नेटकऱ्याला त्याच्याचं भाषेत जुईलीने उत्तर दिलं. ती म्हणाली, “अरे वाह! अहो काल छुल्लू आला होता घरी…उगाच मधे मधे काम करत असताना काहीतरी वायफळ बडबड करत होता…मी बोलले छुल्लूला ‘गप बस’ म्हणून. पण तरी नाही ऐकलं. मग मी छुल्लूला झाडूनी मारून टाकलं. पण छुल्लू हे त्या झुरळाचं नाव होतं.”
तसेच दुसऱ्या नेटकऱ्याने विचारलं, “मशेरी अजून लावताय?” यावर जुईली म्हणाली, “नाही. संपली आहे. आणून देशील का जरा? आणि येताना स्वतःची अक्कल गहाण ठेवली आहेस ती ही आण हां.” तिसऱ्या नेटकऱ्याने “म्हातारी आहे का ही?” अशी प्रतिक्रिया गायिकेच्या पोस्टवर दिली. तर यावर जुईली म्हणाली, “हो. काय सांगू तुम्हाला, काय गुडघे, सांधे दुखतात हो या वयात. कसं मॅनेज करता हो तुम्ही?”
चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं, “हे दोघं एवढे काय खास दिसत नाही आणि फोटो पण एकदम भयानक आहे.” या प्रतिक्रियेवर गायिका म्हणाली, “आणि एवढा असूनही फोट बघून प्रतिक्रिया करायचीच आहे काकूंना.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, “फोटो झूम करून हिच्या दात आणि हिरड्या पाहा.” या नेटकऱ्याला जुईलने चोख उत्तर दिलं. ती म्हणाली, “मस्त आहे ना? अजून झूम करून बघा नसा देखील दिसतील. काकू…माझे दात, माझ्या हिरड्या. मी बघेन काय करायचं ते. हो की नाही? तुम्ही झूम करा. बघत बसा.”
दरम्यान, जुईली व रोहितच्या लग्नाला दुसरं वर्ष सुरू झाला. २०२२मध्ये दोघांचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा, लग्न झालं होतं. २३ जानेवारी २०२२ रोजी दोघं लग्नबंधनात अडकले होते. पुण्यातील ढेपे वाड्यात जुईली व रोहितचा धुमधडाक्यात लग्न झालं होतं.