सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे अनेक कलाकार लग्नबंधनात अडकून आयुष्यातल्या नव्या प्रवासाला सुरुवात करताना दिसत आहेत. नुकताच ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली मुग्धा वैशंपायनच्या मोठ्या बहिणीचा थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत.

काही महिन्यांपूर्वी मुग्धा आणि प्रथमेश लघाटेने प्रेमाची कबुली दिली होती. दोघांनी एक फोटो शेअर करून ‘आमचं ठरलंय’ असं कॅप्शन दिलं होतं. तेव्हापासून दोघं चांगलेच चर्चेत आले. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात मुग्धा आणि प्रथमेशने गुपचूप साखरपुडा केला. त्यामुळे आता दोघं लग्न कधी करतायत? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. पण त्यापूर्वी मुग्धाची मोठी बहीण मृदुल वैशंपायन लग्नबंधनात अडकली आहे.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष

हेही वाचा – हेमंत ढोमे क्षिती जोगला ‘पाटलीण’ या नावाने का हाक मारतो? खुलासा करत म्हणाला, “लग्नानंतर…”

मृदुल वैशंपायन हिने विश्वजीत जोगळेकरबरोबर लग्नगाठ बांधली आहे. तिच्या मेहंदी, हळद आणि लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. लग्नात मुग्धाच्या बहिणीने खास पारंपरिक लूक केला होता. लाल रंगाच्या साडीवर हिरव्या रंगाचा शेला तिने घेतला होता. या लूकमध्ये मृदुलाचं सौंदर्य चांगलंच खुललं होतं. मृदुलच्या पतीने लाल रंगाचे सोवळं आणि उपर्ण परिधान केलं होतं.

काही तासांपूर्वी मुग्धाने जीजूचा कान पिळतानाचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये वैशंपायन भावंड मृदुलाच्या नवऱ्याचा कान पिळताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत मुग्धाने लिहिलं आहे, “जीजचा कान पिळताना आम्ही वैशंपायन भावंड. माझी खात्री आहे, हे कान पिळणं कायम लक्षात राहणारे जीजच्या आणि सगळ्यांच्याच…” मुग्धाच्या या पोस्टवर चाहत्यांनी तिच्या मोठ्या बहिणीला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटासाठी उपेंद्र लिमयेंनी दिलेला नकार; किस्सा सांगत म्हणाले, “संदीप रेड्डी वांगाने स्वत:हून मला…”

दरम्यान, मोठ्या बहिणीच्या लग्नानंतर आता मुग्धा कधी लग्नबंधनात अडकणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. प्रथमेश आणि मुग्धाचा साखरपुडा पार पडला असल्यामुळे दोघं लवकरच लग्न करतील, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.

Story img Loader