‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे प्रथमेश लघाटे घराघरांत लोकप्रिय झाला. त्याच्या सुमधूर गायनाने तो नेहमीच प्रेक्षकांना भारावून टाकतो. मुग्धा-प्रथमेश गायनाच्या कार्यक्रमासाठी अनेक ठिकाणी दौरे करत असतात. सध्या अभिनेता व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत कोकणात आपल्या आजोळी गेला आहे. याचे सुंदर फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
कोकणाच्या निसर्ग सौंदर्याचं प्रत्येकालाच आकर्षण असतं. प्रथमेश लघाटेचं आजोळ देखील कोकणात आहे. याठिकाणचे सुंदर असे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. गायकाने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये सरळ रस्ता पाहायला मिळत आहे. “आमच्या कोकणात दुर्मिळ असलेला सरळ रस्ता” असं कॅप्शन प्रथमेशने या फोटोला दिलं आहे.
प्रथमेश लघाटेने शेअर केलेल्या इतर काही फोटोंमध्ये कोकणातील ओले काजूगर, हिरवंगार रान, गावातील परिसराची झलक पाहायला मिळत आहे. या सगळ्या फोटोंवर गायकाने “आजोळ…” असा हॅशटॅग दिला आहे.
दरम्यान, प्रथमेशच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं, तर डिसेंबर २०२३ मध्ये मुग्धा-प्रथमेश दोघांचा विवाहसोहळा चिपळूण येथे थाटामाटात पार पडला होता. या दोघांच्या लग्नाला कलाविश्वातील व संगीत क्षेत्राशी निगडीत अनेक लोक उपस्थित राहिले होते.