Vaishali Samant : ‘ऐका दाजिबा’ म्हणत रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी लोकप्रिय गायिका म्हणून वैशाली सामंतला ओळखलं जातं. मराठीत गाजलेलं ‘कोंबडी पळाली’ असो ते बॉलीवूडचं ‘छलका छलका रे’ गाण्यापर्यंत… वैशालीने आजवर अनेक सुपरहिट गाणी गायलेली आहेत. नुकतीच ती सावनी रविंद्रच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. यावेळी वैशालीने अनेक मुद्द्यांवर आपली मतं मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी कलाकारांना योग्यवेळी पाठिंबा दिला पाहिजे यावर मत मांडताना वैशाली सामंत म्हणाली, “कलाकार ही स्वतंत्र कंपनी असते आणि ती कंपनी चालवायला नंतर कोणीच नसतं. आपणच आपले सीईओ, आपणच आपले पिऊन आणि आपणच आपले सगळं काही असतो. पण, हे जगाला नाही कळत. मला असं वाटतं की, सरकारला हे समजलं पाहिजे.”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “एक काळ होता जेव्हा कलाकारांना घर मिळायची किंवा कलाकारांना एक पाठिंबा होता. आता काळाची ही गरज आहे की, आपल्याला आपली ऑफिसेस पाहिजेत. आपल्याला पीएफ मिळतो नाही मिळत… आपल्याला पेन्शन सुद्धा मिळत नाही. यामुळेच मला वाटतं की, एखाद्या कलाकाराला यशस्वीपणे पुढे जाण्यासाठी त्याला योग्यवेळी पाठिंबा दिला पाहिजे. बऱ्याचदा मला असतं वाटतं, अरे ही गोष्ट मी पण करू शकले असते माझं ऑफिस असतं तर… हे जे ‘तर’ आहे ना त्याची गरज योग्यवेळी पूर्ण झाली. तर, खरंच कलाकार पुढे जातील. पाठिंबा मिळाला तर, कलाकार सुद्धा तेवढ्याच मेहनतीने काम करतील.”

“महाराष्ट्रातल्या कलाकारांची फक्त आपल्या इथल्याच कलाकारांशी स्पर्धा नाहीये. आपल्याला जगभरातील कलाकारांशी स्पर्धा करायचीये. समुद्रमंथनाची ही वेळ आहे आणि बदल झाला पाहिजे. सरकारने सुद्धा यात लक्ष घालावं असं मला वाटतं” असं मत वैशाली सामंतने मांडलं आहे.