Actress Rutuja Limaye Wedding : २०२४ मध्ये छोट्या पडद्यावरचे बरेच कलाकार लग्नबंधनात अडकले. रेश्मा शिंदे, अभिषेक गावकर, निखिल राजेशिर्के, शाल्व किंजवडेकर, किरण गायकवाड या सगळ्या कलाकारांच्या लग्नातील Inside फोटो गेली महिनाभर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आपल्या आवडत्या कलाकारांना आयुष्यात एक नवीन सुरुवात करत असल्याचं पाहून चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला. आता लोकप्रिय मालिकांमध्ये झळकलेल्या आणखी एका अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली आहे.

छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकणाऱ्या अभिनेत्री ऋतुजा लिमयेचा विवाहसोहळा डिसेंबर महिन्यात थाटामाटात पार पडला. याचे सुंदर फोटो शेअर करत अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. ऋतुजाने लग्नात पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं. लाल रंगाचा भरजरी लेहेंगा, सुंदर दागिने या लूकमध्ये ऋतुजा फारच सुंदर दिसत होती.

paaru fame sharayu sonawane get ukhana for husband Jayant lade
“संसार असतो दोघांचा…”, ‘पारू’ फेम अभिनेत्री शरयू सोनावणेने घेतला हटके उखाणा, म्हणाली…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
paaru fame sharayu sonawane so excited for Divya Pugaonkar
‘पारू’ फेम शरयू सोनावणे ‘या’ अभिनेत्रीच्या लग्नासाठी आहे खूप उत्सुक, म्हणाली…
tejashree jadhav rohan singh wedding photos
मराठी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, पती आहे बँकर; लग्नाचे फोटो पाहिलेत का?
mamta kulkarni took sanyas
२५ वर्षांनी मुंबईत परतलेली ममता कुलकर्णी पोहोचली महाकुंभमध्ये, अभिनेत्री होणार ‘या’ आखाड्याची महामंडलेश्वर
Marathi Actor Abhishek Rahalkar Wedding
आधी गुपचूप साखरपुडा, आता लग्नाचा फोटो आला समोर! मराठी अभिनेता अडकला विवाहबंधनात, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ मालिकेत केलंय काम
karan veer mehra second wife got married
करण वीर मेहराच्या दुसऱ्या बायकोने केलं लग्न, अभिनेत्रीने मंदिरात बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर
riya sen ashmit patel leaked MMS controversy
दिग्गज अभिनेत्रीची नात, एका गाण्याने बनली स्टार; सलग १२ फ्लॉप चित्रपट, MMS लीक झाला अन्…

हेही वाचा : ‘सैराट’ फेम तानाजी गाळगुंडेच्या गर्लफ्रेंडने दिली प्रेमाची कबुली? अभिनेत्याबरोबरचा ‘तो’ फोटो पोस्ट करून लिहिलं….

Rutuja Limaye
ऋतुजा लिमये व हृषिकेश पाटील ( Rutuja Limaye Wedding )

हेही वाचा : ‘लक्ष्मी निवास’ फेम दिव्या पुगावकरची लगीनघाई! शेअर केली लग्नपत्रिकेची खास झलक, २०२१ मध्येच पार पडलेला तिलक समारंभ

ऋतुजाचा नवरा हृषिकेश पाटील सुद्धा अभिनेता व निर्माता म्हणून ओळखला जातो. अभिनेत्रीने साखरपुडा झाल्यावर हे दोघंही गेल्या चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचं स्पष्ट केलं होतं. “१८ एप्रिल २०२१ ते २६ नोव्हेंबर २०२४… रात्री खूप वेळ बोलणं, एकमेकांना दिलेलं वचनं, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड म्हणून चार वर्षांतचा प्रवास ते आयुष्यभराचे जोडीदार हा प्रवास खूपच सुंदर होता.” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. आता ऋतुजा आणि हृषिकेश लग्नबंधनात अडकले असून त्यांनी आयुष्याच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

हेही वाचा : बिग बॉस फेम जोडप्याच्या मुलीचे नाव आले समोर, ‘हा’ आहे नावाचा अर्थ; ‘त्या’ पोस्टमुळे पती पत्नीत मतभेद असल्याची चर्चा

‘मिस्टर अँड मिसेस’ असं म्हणत ऋतुजाने लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर तिने आतापर्यंत अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘नवे लक्ष्य’, ‘जय देवा श्रीगणेशा’ या ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकांमध्ये ती झळकली आहे. तसेच ‘चुकभूल द्यावी घ्यावी’, ‘त्या रात्री काय घडलं’ या मालिकांमध्ये देखील तिने काम केलेलं आहे. भरत जाधव यांच्याबरोबर ‘सही रे सही’ या नाटकात देखील ती झळकली आहे.

Story img Loader