आपल्या आवडत्या कलाकारांचे बालपणीचे फोटो पाहण्यासाठी आपण सगळेच उत्सुक असतो. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आपल्या बालपणीच्या आठवणी चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. आता अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो चर्चेत आला आहे. या अभिनेत्रीने छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. ही अभिनेत्री कोण आहे पाहूयात…
हेही वाचा : Video : “अक्षयाची पहिली मंगळागौर…”, पाठकबाईंच्या हातावर रंगली राणादाच्या नावाची मेहंदी, पाहा खास झलक
छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम करून ही अभिनेत्री घराघरांत पोहोचली. आईच्या वाढदिवसानिमित्त तिने जुन्या आठवणींना उजाळा देत सोशल मीडियावर बालपणीचा फोटो शेअर केला आहे. फोटोमधील या चिमुकलीने लाल रंगाचे टीशर्ट घालून आईच्या शेजारी उभी राहत फोटो काढला आहे. ही चिमुकली अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून लोकप्रिय मराठी अभिनेत्री शिवानी बावकर आहे.
शिवानी बावकरने आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बालपणीचे सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लागिर झालं जी’मालिकेमुळे शिवानी बावकर प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिने शितल हे पात्र साकारले होते. नेटकऱ्यांनी लाडक्या शितलीचा बालपणीचा फोटो पाहून “लहानपणीच्या फोटोत तू गुटगुटीत दिसतेय…”, “खूप सुंदर शिवानी ताई” अशा कमेंट्स केल्या आहेत.
हेही वाचा : “दोघांचं लव्ह मॅरेज होतं, पण दुर्दैवाने…”, पालकांच्या लग्नाबद्दल लेक गश्मीर महाजनीचा खुलासा
दरम्यान, २०१७ मध्ये सुरु झालेली ‘लागिर झालं जी’मालिका २०१९ पर्यंत सुरु होती. या मालिकेला प्रेक्षकांना भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यानंतर शिवानीने ‘अल्टी पल्टी सुमडीत कल्टी’, ‘कुसुम’, ‘लवंगी मिरची’ यामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.