‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. या शोचा सातवा सीझन अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. ‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’ या कुकिंग शोचे पहिल्या सीझनपासूनच चाहते आहेत. सोनी टीव्हीवरील या शोच्या सातव्या पर्वाचे रणवीर ब्रार, गरिमा अरोरा आणि विकास खन्ना हे तीन शेफ परीक्षक आहेत. हा सीझन आता अंतिम टप्प्यात आला असून टॉप ६ स्पर्धक निश्चित झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’ च्या सातव्या सीझनसाठी आलेल्या स्पर्धकांमधून ३६ जणांची निवड करण्यात आली होती. यातून परीक्षकांनी टॉप २१ स्पर्धक निवडले होते. त्यापैकी सहा स्पर्धकांनी टॉप स्पर्धकांमध्ये जागा मिळवली आहे. ‘जर्नी टू फिनाले’ दरम्यान झालेल्या तीन टास्कमध्ये सचिन हा स्पर्धक खरा उतरला नसल्यामुळे त्याचा शोमधील प्रवास संपला.

हेही वाचा>> “वाघ तर आपण लहानपणापासून होतो” हेमंत ढोमेच्या पोस्टवर पत्नीची कमेंट, म्हणाली “पालीची…”

हेही वाचा>> लग्न, मुलगा, सहा वर्षांनी घटस्फोट, वादविवाद अन्…; दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली शालीन भानोतची पत्नी दलजित कौर, पाहा फोटो

‘टिकट टू फिनाले’ टास्कमध्ये बाजी मारत पंजाबच्या कमलदीप कौर यांनी थेट फिनालेचं टिकीट मिळवलं होतं. त्यानंतर ‘जर्नी टू फिनाले’ दरम्यान झालेल्या टास्कमध्ये शांता शर्मा, नयनज्योती, गुरकीरत सिंग, सुवर्णा बागुल आणि अरुणा विजय या स्पर्धकांनी ‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’च्या टॉप ६ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवलं आहे.

हेही वाचा>> “नातेवाईक हा प्रकारच मला नकोसा वाटतो” प्रसाद ओकचं वक्तव्य, म्हणाला “माझ्या पत्नीने…”

‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’च्या सातव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा लवकरच पार पडणार आहे. यंदाच्या पर्वाच्या ट्रॉफीसाठी स्पर्धकांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. ‘मास्टरशेफ ऑफ इंडिया ७’ च्या ‘गोल्डन कोट’वर कोण नाव कोरणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Masterchef of india 7 gets top 6 contestant who will win the show kak