‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’ हा छोट्या प़डद्यावरील लोकप्रिय शो आहे. पहिल्या पर्वापासूनच या शोला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या शोच्या सातव्या पर्वालाही प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं. ‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’चं सातवं पर्व अंतिम टप्प्यात असून यंदाच्या पर्वाचे टॉप ३ फायनलिस्ट समोर आले आहेत.
शान्ता, नयनज्योती व सुवर्णा बागुल हे ‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’च्या सातव्या पर्वाचे टॉप ३ स्पर्धक आहेत. यापैकी सुवर्णा बागुल या महाराष्ट्राच्या आहेत. सुवर्णा यांनी ‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’च्या टॉप ३मध्ये स्थान मिळवल्याने चाहतेही आनंदी आहेत. सुवर्णा यांनी महाराष्ट्राच्या मसालेदार पदार्थांनी परिक्षकांची मनं जिंकली होती.
‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’च्या सातव्या पर्वाच्या टॉप ३ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवल्यानंतर सुवर्णा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मास्टरशेफ शोमधील त्यांच्या प्रवासाची झलक पाहायला मिळत आहे. “देव नेहमी तुमच्याबरोबर असतो. फक्त विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम” असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे.
हेही वाचा>> लेकीच्या आत्महत्येनंतर आकांक्षा दुबेच्या आईची मुख्यमंत्र्यांना विनंती, म्हणाली “योगी सरकार…”
सुवर्णा बागुल यांनी शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘मास्टरशेफ ऑफ इंडिया’च्या सातव्या पर्वाचा विजेता लवकरच घोषित केला जाणार आहे. टॉप ३ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवलेल्या महाराष्ट्राच्या सुवर्णा बागुल मास्टरशेफच्या सातव्या पर्वाच्या विजेता होणार का, हे पाहणं रंजक ठरणार आहे,