‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून मायराने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि सर्वांची शाबासकी मिळवली. तिचा निरागसपणा प्रेक्षकांना भावला. तिचे आई-वडील सोशल मीडियावरून मायराबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांची शेअर करत असतात. आता सर्वांची लाडकी परी श्रीकृष्णाच्या वेशभूषेत सजली आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही मालिका जरी संपली असली तरी मायर सोशल मिडियावरून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. या मालिकेमुळे तिचा चाहतावर्ग खूप वाढला आहे. तिचे आई-वडील सोशल मिडियावर सक्रिय राहून मायरच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी तिच्या चाहत्यांशी शेअर करत असतात. आता तिचे काही फोटो खूप व्हायरल होत आहेत.

Two Ladies and boy inside DTC bus over Seat issues shocking video
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; महिलांच्या भांडणामध्ये आलेल्या तरुणानं खाल्ला मार; VIDEO एकदा पाहाच
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
annapoorna issue srinivasan reaction
“झालं ते विसरून पुढं जायला हवं”, ‘त्या’ व्हिडीओवरील वादावर अन्नपूर्णा हॉटेलचे संचालक श्रीनिवासन यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ज्यांनी…”
Anand Hendre created a world cup scene for Ganeshotsav
असा देखावा पाहिलाच नसेल! १५ फूट ऊंच बॅट, वर्ल्ड कपची ट्रॉफी आणि भल्या मोठ्या चेंडूत गणपती बाप्पा
Success Story Of Ashley Nagpal
success story : मुंबईत खरेदी केलं ‘सी-फेसिंग अपार्टमेंट! वाचा भारतीय व्यावसायिक ॲशले नागपाल यांची यशोगाथा
Ajit Agarkar to Sent Musheer Khan on Australia Tour with India A Squad Just After 7 Matches Impressed by His Innings
Musheer Khan: मुशीर खानच्या खेळीवर अजित आगरकर फिदा; फक्त ७ सामने खेळूनही जाणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
when raj kapoor met nargis dutt at rishi kapoor wedding
“माझे पती देखणे अन् रोमँटिक आहेत, त्यामुळे…”; नर्गिस यांना स्पष्टच बोलल्या होत्या राज कपूर यांच्या पत्नी
Remembering iconic talk show host Phil Donahue
व्यक्तिवेध : फिल डॉनाह्यू

हेही वाचा : “आज तू सातासमुद्रापार…” लेकीच्या वाढदिवशी सुकन्या मोने भावूक, पोस्ट चर्चेत

मायरने नुकतंच तिचं एक नवीन फोटोशूट केलं. या फोटोंसाठी तिने श्रीकृष्णाची वेशभूषा केली आहे. निळ्या रंगाचे काठ असलेला पिवळ्या रंगाचा तिचा ड्रेस आहे आणि त्यावर मोरपिसदेखील आहे. यासोबतच डोक्यावर मोती लावलेली पगडीही तिने घातली आहे. ही वेशभूषा मायरासाठी खूपच खास आहे. याचं कारण म्हणजे हा ड्रेस स्वतः तिच्या आईने डिझाईन केला आहे. यासोबतच मायराने अंगावर मोत्याचे दागिने परिधान केले आहेत.

आणखी वाचा : Video: परीच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना बेहरेची खास पोस्ट, म्हणाली, “मला तू…”

या लूकमध्ये ती अत्यंत गोड दिसत आहे. आता तिचे हे फोटो सोशल मिडियावर खूपच व्हायरल होत आहेत. या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत तिचं हे गोजिरवाणं रूप आवडल्याचं तिला सांगितलं आहे.