‘खुलता कळी खुलेना’ ‘इमली’ या मालिकांमुळे लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री म्हणून मयुरी देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ व सुविचार शेअर करत असते. नुकतीच तिने एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने विश्वासाची ताकद सांगितली आहे.

अफेअर, सात वर्षांचा संसार, चार वर्षांची लेक अन्…, अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा

“मानसिक धक्क्यातून सावरण्याची, संघर्षाला वाढीमध्ये आणि भीतीला प्रेमात बदलण्याची शक्ती माझ्या विश्वासामध्ये आहे,” असं तिने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे. ज्या कुणाला हे वाचण्याची गरज आहे, त्यांच्यासाठी, असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे.

तिच्या या पोस्टवर चाहते कमेंट करून खुश राहा, मजबूत राहा असं म्हटलं आहे. अनेकांनी तिने शेअर केलेले विचार खूप चांगले आहेत, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी मयुरीच्या पतीने आत्महत्या केली. पती आशुतोष भाकरेच्या निधनानंतर मयुरी ही त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे बऱ्यादचा ती हिंमत देणाऱ्या, भावना व्यक्त करणाऱ्या पोस्ट शेअर करत असते.

Story img Loader