‘झी मराठी’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ’. अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेत भाव खाऊन गेली ती म्हणजे परी अर्थात बालकलाकार मायरा वायकुळ. मायराने आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. अशी ही लोकप्रिय बालकलाकार मायरा वायकुळ आता मोठी ताई झाली आहे. मायराची आई श्वेता वायकुळ यांनी आज एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी मायराच्या सोशल मीडिया पेजवरून शेअर करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

९ एप्रिलला काही फोटो शेअर करून मायरा वायकुळने मोठी ताई होणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसंच यावेळी वायकुळ कुटुंबात गोंडस बाळाचं आगमन कधी होणार? याचा देखील खुलासा केला होता. त्यानुसार आज वायकुळ कुटुंबात एका गोंडस बाळाचं आगमन झालं आहे. “आमचा छोटा सुपरहिरो आला आहे. आमच्या बाळाला हॅलो म्हणा”, अशी पोस्ट करत मायराने आनंदाची बातमी दिली आहे.

हेही वाचा – ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप! अभिनेता हरीश दुधाडेने भावुक पोस्ट करत म्हणाला, “गेली तीन वर्ष…”

मायरा वायकुळच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया देत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “अभिनंदन”, “मायरा ताई झाली”, “अभिनंदन मायरा तुझी आता मोठी बहीण म्हणून बढती झाली आहे”, “मायराच्या कुटुंबाचं अभिनंदन”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: संग्राम चौगुले ठरला ‘फुसका बॉम्ब’, घरातील सदस्यांनी अरबाजला दिलं बहुमत, रितेश देशमुख म्हणाला…

दरम्यान, मायरा वायकुळच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘माझी तुझी रेशीमगाठ’नंतर हिंदी मालिकाविश्वात पदार्पण केलं होतं. ‘कलर्स टीव्ही’वरील ‘नीरजा: एक नयी पहचान’ या मालिकेत ती झळकली होती. या हिंदी मालिकेत मायरा अभिनेत्री स्नेहा वाघबरोबर प्रमुख भूमिकेत दिसली. यानंतर मायराने मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटात ती पाहायला मिळाली. या चित्रपटात ती मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सारंग साठ्ये, सुकन्या मोने, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत अशा तगड्या कलाकारांबरोबर झळकली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mazhi tuzhi reshimgaath fame myra vaikul and her family welcome their baby boy pps