मराठी मालिकाविश्वात बोलबोला असलेली बालकलाकार म्हणजे मायरा वायकुळ. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या मायराने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अटळ स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील मायराने साकारलेली परी अजून प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. सध्या मायराचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे; ज्यामध्ये मायरा दिवाळीची पहाट साजरी करताना दिसत आहे.
हेही वाचा – मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत सलमान खानला मिठी मारणारी ऐश्वर्या राय-बच्चन नसून आहे तरी कोण? जाणून घ्या..
दरवर्षी दिवाळीत नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केलं जातं. तेल, उटणं किंवा अत्तर लावून अभ्यंगस्नान केलं जातं. त्याप्रमाणेच मायराने देखील उटणं लावून अभ्यंगस्नान करून दिवाळी पहाट साजरी केली. याचा व्हिडीओ मायराच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडीओत, सुरुवातीला मायराला तिची आई उटणं लावताना दिसतं आहे. त्यानंतर अभ्यंगस्नान करून तिचं औक्षण केलं जात आहे. मग मायरा फराळाचा आस्वाद घेताना दिसत आहे. लाडू, चकली ती खाताना पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – Video : देशमुखांची दिवाळी! जिनिलीयाने उटणं लावून दोन्ही मुलांना घातलं अभ्यंगस्नान, व्हिडीओ व्हायरल
मायराच्या या गोड व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. “वा परी क्या बात है… खूप छान दिसते”, “खूप छान मायरा पिल्लू… दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा”, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया मायराच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा – दिवाळीच्या मुहूर्तावर शिंदेशाहीचं उद्योग जगतात पदार्पण; पंढरपुरात सुरू केलं पहिलं…
दरम्यान, मायराच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘माझी तुझी रेशीमगाठ’नंतर हिंदी मालिकाविश्वात पदार्पण केलं होतं. कलर्स टीव्हीवरील ‘नीरजा: एक नयी पहचान’ या मालिकेत ती झळकली होती.