‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मायरा वायकुळ नेहमी चर्चेत असते. कधी तिच्या कामामुळे तर कधी तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे. मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय बालकलाकारांपैकी मायरा एक आहे. लहान वयातच तिने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. आता मायराने सिनेसृष्टीतही पदार्पण केलं आहे. तिचा पहिला-वहिला मराठी चित्रपट ‘नाच गं घुमा’ लवकरच भेटीस येणार आहे. अशातच मायराने एक आनंदाची बातमी दिली आहे.

हेही वाचा – Video: अजय-अतुलच्या कॉन्सर्टमध्ये रोहित राऊतचा जबरदस्त परफॉर्मन्स, नेटकरी म्हणाले, “क्रिकेटमध्ये रोहित शर्मा अन्…”

Ranbir Kapoor and Alia Bhatt daughter raha clicks Shaheen Bhatt photo
रणबीर कपूर-आलिया भट्टची दोन वर्षांची लेक झाली फोटोग्राफर! राहाने आई-बाबांचा नाही तर ‘या’ खास व्यक्तीचा काढला सुंदर फोटो
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Police solve problem of relationship between daughter mother and mothers boyfriend
मुलगी आणि प्रियकराच्या नात्यात अडकले आईचे मन, अखेर मुलीनेच…
Woman with baby in babys belly gives birth safely
‘फिट्स इन फिटू’ : ‘त्या’ महिलेची प्रसूती सुखरूप! पोटातील बाळाची शस्त्रक्रिया…
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
Kushal Badrike Post For Shreya Bugde
“तुला भेटल्यावर…”, श्रेया बुगडेच्या वाढदिवसानिमित्त कुशल बद्रिकेची खास पोस्ट; म्हणाला, “स्वर्गसुद्धा नरक वाटेल…”
Aai Aani Baba Retire Hot Aahet
Video : भर लग्नमंडपातून स्वीटीचा भाऊ तिला घेऊन जाणार? पाहा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेचा नवा प्रोमो
Meera Jaggnath
ज्याच्यासाठी साखरपुडा मोडला तो मुलगाच…; ‘ठरलं तर मग’फेम मीरा जगन्नाथने केला खुलासा; म्हणाली, “सहा महिन्यांनी…”

मायरा वायकुळच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर करण्यात आले आहेत; ज्यामधून आनंदाची बातमी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या फोटोमध्ये मायराच्या हातात पाटी दिसत आहे, ज्यावर लिहिलं आहे, ‘माझ्याकडे एक गुपित आहे.’ दुसऱ्या फोटोमध्ये मायरा आणि तिचे आई-वडील पाहायला मिळत आहेत. या फोटोतील पाटीवर लिहिलं आहे, ‘मी आता लवकरच मोठी बहीण होणार आहे.’ तिसऱ्या फोटोमधून वायकुळ कुटुंबात गोंडस बाळाचं आगमन कधी होणार, तो महिना जाहीर करण्यात आला आहे. सप्टेंबर २०२४मध्ये मायराच्या घरी पाळणा हलणार आहे आणि मायरा मोठी ताई होणार आहे.

मायराने दिलेली ही आनंदाची बातमी वाचून नेटकरी तिचे आई-बाबा श्वेता व गौरव वायकुळ यांना शुभेच्छा देत आहेत. मायराची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.

हेही वाचा – “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तून बाहेर पडले याचा अर्थ…”, विशाखा सुभेदारच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

दरम्यान, मायराच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘माझी तुझी रेशीमगाठ’नंतर हिंदी मालिकाविश्वात पदार्पण केलं होतं. ‘कलर्स टीव्ही’वरील ‘नीरजा: एक नयी पहचान’ या मालिकेत ती झळकली होती. आता तिचा पहिला मराठी चित्रपट ‘नाच गं घुमा’ १ मेला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Story img Loader