‘झी मराठी’ वाहिनीच्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेली मायरा वायकुळ सध्या तिच्या छोट्या भावाबरोबर एन्जॉय करत आहे. मायरा आता मोठी ताई झाली आहे. नुकतीच तिने आपल्या चिमुकल्या भावाबरोबर पहिली भाऊबीज साजरी केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता मायराच्या चिमुकल्या भावावर कर्णवेध संस्कार झाले आहेत. याचा व्हिडीओ मायराच्या भावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

९ एप्रिलला मायरा वायकुळने सोशल मीडियाद्वारे मोठी ताई होणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर १५ सप्टेंबरला श्वेता वायकुळ यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. या गोंडस बाळाचं वायकुळ कुटुंबाने मोठ्या उत्साहाने घरी स्वागत केलं. २७ ऑक्टोबरला मायराच्या चिमुकल्या भावाची पहिली झलक पाहायला मिळाली. त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर त्याचे गोड फोटो शेअर करण्यात आले होते.

हेही वाचा – …म्हणून मराठी अभिनेत्रींना हिंदीत दिलं जातं कामवाल्या बाईचं काम, तृप्ती खामकरने सांगितलं पडद्यामागचं सत्य

वायकुळ कुटुंबाने दिवाळी वसुबारसपासून ते भाऊबीजपर्यंत पारंपरिक पद्धतीने आपल्या नव्या पाहुण्यासह साजरी केली. नुकतंच मायराच्या भावावर कर्णवेध संस्कार झाले. म्हणजे त्याचे कान टोचले. हिंदू धर्मातील १६ संस्कारांपैकी एक कर्णवेध संस्कार आहे. मायराच्या चिमुकल्या भावावर झालेल्या कर्णवेध संस्काराचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये, मायराच्या भावावर कर्णवेध संस्कार पारंपरिक पद्धतीने केले जात आहेत. बाळाचे कान टोचल्यानंतर सुक्या खोबऱ्याची वाटी फोडली जात आहे. हा व्हिडीओ पाहून मायराच्या पालकांचं कौतुक केलं जात आहे.

हेही वाचा – Video: “गरबा संपला ताई…”, इरिनाचा ‘नगाडा संग ढोल’वरील डान्स पाहून नेटकऱ्याची प्रतिक्रिया, उत्तर देत म्हणाली, “हो मला…”

हेही वाचा – रुपाली भोसलेनंतर ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्याने दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी केली आलिशान गाडी, पाहा फोटो

दरम्यान, मायरा वायकुळच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘माझी तुझी रेशीमगाठ’नंतर हिंदी मालिकाविश्वात पदार्पण केलं होतं. ‘कलर्स टीव्ही’वरील ‘नीरजा: एक नयी पहचान’ या मालिकेत ती झळकली होती. या हिंदी मालिकेत मायरा अभिनेत्री स्नेहा वाघबरोबर प्रमुख भूमिकेत दिसली. यानंतर मायराने मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटात ती पाहायला मिळाली. या चित्रपटात ती मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सारंग साठ्ये, सुकन्या मोने, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत अशा तगड्या कलाकारांबरोबर झळकली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mazhi tuzhi reshimgaath fame myra vaikul little brother ears were pierced video viral pps