मराठी मालिका आणि सिनेसृष्टीतील लोकप्रिय बालकलाकर मायरा वायकुळ आता मोठी ताई झाली आहे. १५ सप्टेंबरला श्वेता वायकुळ यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यामुळे सध्या वायकुळ कुटुंबातला आनंद द्विगुणित झाला आहे. काही दिवसांपूर्वीच मायराच्या चिमुकल्या भावाची पहिली झलक पाहायला मिळाली. त्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदा मायरा वायकुळेच्या भावाची पहिली दिवाळी आहे. त्याची ही पहिली दिवाळी पारंपारिक पद्धतीने साजरी केली जात आहे. नुकताच अभ्यंगस्नानाचा व्हिडीओ मायराच्या भावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दिवाळीच्या पहिल्या अंघोळी निमित्ताने पाटाभोवती खास फुलांची रांगोळी काढलेली पाहायला मिळत आहे. यामध्ये उटणं, तेल आणि मायरा भावाचे सुंदर कपडे ठेवले आहेत. तसंच पाटाच्या दोन्ही बाजूला समई लावल्या आहेत.

हेही वाचा – ठरलं! ‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा घेणार निरोप, मिलिंद गवळी पोस्ट करत म्हणाले, “या प्रवासामध्ये…”

पुढे मायरा आपल्या लाडक्या भावाला उटणं लावताना दिसत आहे. त्यानंतर चिमुकल्याला अंघोळ घालून त्याचं औक्षण करताना श्वेता वायकुळ पाहायला मिळत आहे. मायराच्या भावाच्या पहिला अंघोळीच्या या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसंच पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करत असल्यामुळे वायकुळ कुटुंबाचं कौतुकही होतं आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: विवियन डिसेनाने ‘या’ दोन सदस्यांना पाठवलं जेलमध्ये, रेशन वाटपाचा अधिकार असणार आता यांच्या हातात

दरम्यान, मायरा वायकुळच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘माझी तुझी रेशीमगाठ’च्या माध्यमातून मराठी मालिकाविश्वात पदार्पण केलं होतं. अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेत भाव खाऊन गेली ती म्हणजे परी अर्थात मायरा वायकुळ. मायराने आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.

हेही वाचा – Bigg Boss 18: अविनाशने शर्टलेस होऊन ईशाबरोबर केला डान्स, तर करणवीर चुम दरांगबरोबर रोमँटिक गाण्यावर थिरकला, पाहा व्हिडीओ

त्यानंतर मायरा ‘कलर्स टीव्ही’वरील ‘नीरजा: एक नयी पहचान’ या मालिकेत झळकली होती. या हिंदी मालिकेत मायरा अभिनेत्री स्नेहा वाघबरोबर प्रमुख भूमिकेत दिसली. यानंतर मायराने मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटात ती पाहायला मिळाली. या चित्रपटात ती मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सारंग साठ्ये, सुकन्या मोने, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत अशा तगड्या कलाकारांबरोबर झळकली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mazhi tuzhi reshimgaath fame myra vaikul little brother first diwali 2024 watch video pps