‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका ‘झी मराठी’वरील गाजलेल्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेने साडे चार वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं होतं. राधिका, गुरू, शनाया या पात्रांना तर प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळालं. अशा या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्रीने नुकतीच आलिशान गाडी घेतल्याचं समोर आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील राधिका म्हणजे अभिनेत्री अनिता दाते-केळकरने आलिशान गाडी खरेदी केली आहे. याचा व्हिडीओ संबंधित शोरुमने त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या व्हिडीओत, अनिता आपल्या नव्या गाडीच आनंदात स्वागत करताना दिसत आहे. औक्षण करून आणि केक कापून तिने नवी गाडी घेतल्याचा आनंद साजरा केला आहे. तिच्या आनंदात अभिनेते उमेश जगताप देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनिताच्या नव्या गाडीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे.

हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेता अमित भानुशाली झळकणार नव्या भूमिकेत! पाहा व्हिडीओ

अनिताने Exter Hyundai ही गाडी घेतली आहे. कार ट्रेडच्या माहितीनुसार, अनिताने घेतलेल्या गाडीची किंमत ६ ते १० लाखांच्या आसपास आहे. दरम्यान, अनिताने नवीन गाडी घेतल्यामुळे सध्या तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. अभिनेता अक्षर कोठारी, मयूरी वाघ, श्रृती मराठे, शर्मिला शिंदे, किशोरी अंबिये, राधिका आपटे अशा अनेक कलाकारांनी नव्या गाडीनिमित्ताने अनिताला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – ‘पारू’चा खऱ्या आयुष्यातील जोडीदार आहे तरी कोण? लग्नाच्या फोटोवरून होतेय चर्चा

अनिताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या ती ‘कलर्स मराठी’वरील नवीन मालिका ‘इंद्रायणी’मध्ये पाहायला मिळत आहे. या मालिकेत अनिताने आनंदीबाई भूमिका साकारली आहे. याशिवाय तिचं ‘माझ्या बायकोचा नवरा’ हे नाटक देखील रंगभूमीवर सुरू आहे. या नाटकात अनितासह अभिनेता पुष्कराज चिरपुटकर आणि सागर देशमुख प्रमुख भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mazhya navryachi bayko fame actress anita date kelkar bought new car video viral pps