छोट्या पडद्यावरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे या कलाकारांनी साकारलेल्या प्रमुख भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. यश व नेहाची मालिकेतील केमिस्ट्रीही प्रेक्षकांना भावली. परंतु, दीड वर्ष मनोरंजन केल्यानंतर आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंगही पूर्ण करण्यात आलं आहे. श्रेयस व प्रार्थनाने माझी तुझी रेशीमगाठ मालिकेच्या संपूर्ण टीमसाठी छोट्याशा पार्टीचं आयोजन केलं होत. या पार्टीत प्रार्थना भावूक झाल्याचं तिने सांगितलं. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “मी मालिकेत खूप रडते. पण मला खऱ्या आयुष्यात खूप कमी रडूव येतं. एखाद्या गोष्टीचं मला वाईट वाटतं, पण लगेच तितकं रडू येत नाही. पण त्यादिवशी परी रडत होती. मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर यांनी बोलायला सुरुवात केल्यानंतर मी भावूक झाले”.
हेही वाचा>> ‘वेड’मधील सत्या आणि श्रावणीचं पुढे काय झालं? रितेश देशमुखने स्वत:च केला खुलासा; व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
“अजय सरांचं भाषण ऐकून मला इतकं रडू आलं की मी श्रेयस सरांना मिठी मारुन रडायलाच लागले. मला कळलंच नाही मला का रडू आलं. पण मी तेव्हा खूप रडले”, असंही पुढे प्रार्थना म्हणाली.
हेही पाहा>> …अन् राणादाने पाठकबाईंना सगळ्यांसमोरच उचललं; अक्षया-हार्दिकची लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत, पाहा फोटो
‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या प्रार्थनाने अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. अनेक चित्रपटांत काम केल्यानंतर प्रार्थनाची पावलं पुन्हा छोट्या पडद्याकडे वळली. ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील प्रार्थनाने साकारलेल्या नेहा या पात्राने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली.