छोट्या पडद्यावरील ‘बस बाई बस’ हा लोकप्रिय शो आहे. कलाविश्वासह विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या महिला या शोमध्ये सहभागी होतात. अभिनेता स्वप्निल भावे या शोचं सूत्रसंचालन करत आहे. कार्यक्रमातील इतर महिला आणि सुबोध भावे मिळून सहभागी महिलेला बोलतं करतात. नुकतंच या शोमध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि काजल काटे हिने हजेरी लावली.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून काजल घराघरात पोहोचली. या मालिकेतील ‘शेफाली’ या पात्राने तिला लोकप्रियता मिळवून दिली. या शोमध्ये तिने कलाविश्वात करिअर करतानाचा सुरुवातीच्या काळातील एक प्रसंग सांगितला. मुळची नागपूरची असलेल्या काजलला शोमधील महिलेने “कोणाला कधी नागपूरी मुलीचा इंगा दाखवला आहे का?”, असा प्रश्न विचारला.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण

हेही वाचा >> उर्वशी रौतेलाने इराणमधील महिलांसाठी कापले केस, पोस्ट शेअर करत म्हणाली “हिजाबविरोधी…”

हेही वाचा >> कियारा अडवाणीबरोबरच्या लग्नाच्या चर्चांवर सिद्धार्थ मल्होत्राला शुभेच्छा देत सलमान खान म्हणाला, “शादी मुबारक…”

काजलला या प्रश्नाचे उत्तर देताना करिअरच्या सुरुवातीच्या काळातील दिवस आठवले. त्यावेळचा एक प्रसंग शेअर करत ती म्हणाली, “मुंबईत करिअर करण्यासाठी आल्यानंतर मी एका ठिकाणी ऑडिशन द्यायला गेले होते. त्या निर्माती कंपनीतील एका माणसाने मला डायरेक्ट तू कॉम्प्रोमाईझ करशील का? असं विचारलं. हे ऐकल्यावर मी त्याच्या कानाखाली दिली. त्याला म्हणाले, यापुढे असं कोणत्याही मुलीला विचारलं तर तुझी खैर नाही”.

हेही पाहा >> Photos : आलिया भट्टने पहिल्यांदाच केलं मॅटर्निटी फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं पाऊट

पुढे ती म्हणाली, “त्यावेळी रात्रीचे आठ वाजले होते. एकटीच तिथे असल्यामुळे मी माझ्या मित्राला फोन करुन बोलवून घेतलं. जर या माणसाने काही चुकीचं केलं तर माझा मित्र माझ्याबरोबर असेल. तिथून निघाल्यानंतर मी घरी येऊन खूप रडले. मी यापूर्वीही याबद्दल ऐकलं होतं. पण असं कोणी कसं काय विचारू शकतं, हे मला कळत नव्हतं”.

Story img Loader