‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत शनायाची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री रसिका सुनील सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती फोटो व व्हिडीओ शेअर करत वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती चाहत्यांना देत असते. तसेच तिच्या कामाबद्दलचे अपडेट शेअर करत असते. आता तिने एक आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. रसिकाने नवीन कार खरेदी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Photos: अनुराग कश्यपच्या मुलीची परदेशी बॉयफ्रेंडशी एंगेजमेंट; आलिया-शेनच्या पार्टीतील खास फोटो पाहिलेत का?

लँडमार्क कारने रसिकाला इन्स्टाग्रामवर टॅग करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती शोरुममधून कार घेताना दिसत आहे. तिने मर्सिडीज बेंझ खरेदी केली आहे. या व्हिडीओमध्ये ती शोरुमध्ये एंट्री घेताना दिसते. नंतर ती व तिचे कुटुंबीय सगळ्या फॉरमॅलिटी पूर्ण करतात आणि त्यांना कारची डिलिव्हरी मिळते. या व्हिडीओत रसिका व तिचे कुटुंबीय प्रचंड आनंदी दिसत आहे.

दरम्यान, या व्हिडीओवर चाहते व इंडस्ट्रीतील रसिकाचे मित्र-मैत्रिणी कमेंट करून तिला शुभेच्छा देत आहेत. प्रियांका केतकरने रसिकाला शुभेच्छा देत ‘चल राउंड मारून येऊयात’, असं म्हटलंय. तसेच भुषण प्रधाननेही तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mazya naryachi bayko fame rasika sunil bought mercedes benz see video hrc