टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १६’ चा ग्रँड फिनाले रविवारी पार पडला. फिनालेमध्ये प्रियंका चहर चौधरी, एमसी स्टॅन व शि ठाकरे टॉप ३ स्पर्दक होते. यापैकी शिव व प्रियंकाला मागे टाकत एमसी स्टॅनने बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. शिव किंवा प्रियंका जिंकतील, अशा चर्चा असताना स्टॅनने हा शो जिंकला आणि अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला.
Bigg Boss 16 Trophy Price: सोनं व हिऱ्यांनी बनली आहे ‘बिग बॉस’ची ट्रॉफी; किंमत वाचून व्हाल थक्क
टॉप ३ स्पर्धकांपैकी प्रियंका बाद झाली. त्यानंतर शिव व स्टॅन यापैकी एक जण विजेता ठरणार होता. खूप साऱ्या सस्पेन्सनंतर होस्ट सलमान खानने बिग बॉसच्या विजेत्याची घोषणा केली. अवघ्या २३ वर्षांचा रॅपर एमसी स्टॅन यंदाचा विजेता ठरला. शो जिंकल्यानंतर एमसी स्टॅनने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
इंडिया टुडेशी बोलताना स्टॅन म्हणाला, “नाही, मला अशी अपेक्षा नव्हती की मी जिंकेल. मला वाटलं होतं की माझा भाऊ (शिव) शो जिंकेल. आमचं असं बोलणं झालं होतं की एकतर तो जिंकेल किंवा मी जिंकेल. शेवटपर्यंत आम्ही तेच बोलत होतो. सर्व १६ स्पर्धक हा शो जिंकण्यास पात्र आहेत, असं मला वाटतं.”
सलमान खान जेव्हा त्याच्या आणि शिव यांच्यातील विजेत्याची घोषणा करणार होता तेव्हा कसं वाटत होतं, याबद्दल स्टॅनने सांगितलं. “त्यावेळी मी रडावं की हसावं, अशीच परिस्थिती होती. मी शोमध्ये शांत बसायचो तर मला कमकुवत समजलं जायचं. खरं तर मी माझ्या फॅमिलीला खूप मिस करायचो, पण ते कुणाला सांगायचो नाही,” असं एमसी स्टॅन म्हणाला.