पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनने ‘बिग बॉस’च्या १६व्या पर्वाचं विजेतेपद जिंकलं. त्यानंतर सातत्याने त्याचीच चर्चा सुरू आहे. शो जिंकल्यानंतर स्टॅनच्या फॅन फॉलोइंगमध्ये मोठी वाढ झाली आहे, तसेच चाहते अजूनही स्टॅनवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“आता पुन्हा कधीच…” शिवसेना गमावल्यानंतर उद्धव ठाकरेंवर कंगना रणौतची सडकून टीका

एमसी स्टॅन ‘बिग बॉस’चा विजेता ठरल्यानंतर त्याच्या सोशल मीडिया पोस्टने नवनवे विक्रम रचले आहेत. विजेतेपदानंतरच्या त्याच्या पहिल्या पोस्टला विराट कोहलीच्या पोस्टपेक्षाही जास्त लाइक्स मिळाले होते. तर, त्याच्या इन्स्टा लाइव्हला तब्बल 541K लोकांनी म्हणजेच ५ लाख ४१ हजार लोकांनी लाइव्ह पाहिलं होतं. त्याच्या या लाइव्हचा जगातील टॉप १० लाइव्हमध्ये समावेश झाला आहे. तर, भारतात सर्वाधिक लाइव्ह व्ह्यूज मिळवणारा तो पहिला व्यक्ती ठरला आहे.

Video: पहिल्या पतीने मसाबा गुप्ताशी लग्न केल्यानंतर अदिती राव हैदरीही ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात? थेट प्रश्न विचारताच अभिनेत्री म्हणाली…

दरम्यान, ज्या बिग बॉस शोने स्टॅनला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन पोहोचवलं, त्या शोमधील प्रवासाबद्दल स्टॅनने फक्त दोन शब्दांत त्याचा अनुभव सांगितला आहे. बिग बॉसमधील तुझा प्रवास कसा होता? असा प्रश्न विचारल्यावर ‘वाकडा, तिकडा’ या दोन शब्दांत स्टॅनने उत्तर दिलं.

स्टॅनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याच्या या उत्तराचं त्याचे चाहते कौतुक करत आहेत. ‘स्टॅन बेस्ट आहे’, अशा कमेंट्स त्याच्या चाहत्यांनी केल्या आहेत.