स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनिअर्सचा’ या डान्सिंग रिएलिटी शोचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. पिंपरी-चिंचवडच्या सई आणि शरयू यंदाच्या पर्वाच्या विजेत्या ठरल्या. रविवारी(४ जून) पार पडलेल्या ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनिअर्सचा’ या शोच्या महाअंतिम सोहळ्यात सई आणि शरयूने प्रेक्षकांची मनं जिंकून ट्रॉफीवर नाव कोरलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनिअर्सचा’ यंदाच्या पर्वात सागर आणि दिवेश, झिरो डिग्री क्रू ग्रुप, डी टू डी क्वीन्स ग्रुप, श्रीमयी सूर्यवंशी, सई आणि शरयू हे पाच फायनलिस्ट होते. अंकुश चौधरी, फुलवा खामकर व वैभव घुगे हे या पर्वात परिक्षक होते. परिक्षकांनी अंतिम निकाल देत सई व शरयूला ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनिअर्सचा’ विजेता म्हणून घोषित केलं.

हेही वाचा>> Video : फेटा, सदरा, पारंपरिक लूक अन्…; ‘दबक्या पावलांनी आली’ गाण्यावर किली पॉलचा भन्नाट डान्स, रिल व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनिअर्सचा’ या शोच्या यंदाच्या पर्वाचा विजेता ठरलेल्या सई व शरयूला ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आलं. तर त्यांना पाच लाख रुपये रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली आहे.

सागर आणि दिवेश ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनिअर्सचा’ या शोच्या यंदाच्या पर्वाचे उपविजेता ठरले. झीरो डिग्री क्रू ग्रुप आणि डी टू डी क्वीन्स ग्रुपला विभागून तिसरा क्रमांक देण्यात आला. तर श्रीमयी सुर्यवंशीला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Me honar superstar jallosh juniors cha winner sai ani sharayu lift the trophy kak