मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांच्या घरी सध्या लगीनघाई सुरु आहे. अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे, स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांच्यानंतर आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मीरा जोशीने लग्नाची तारीख जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसह समुद्रकिनाऱ्यावरील फोटो शेअर केले होते. परंतु, यात तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा दिसत नव्हता. आज मीराने बॉयफ्रेंडचा चेहरा दाखवत लग्नाबद्दल माहिती दिली आहे.

हेही वाचा : “मुलीवर प्रेम असल्याचं…”, करण जोहरने केला मोठा खुलासा; म्हणाला, “‘त्या’ शब्दामुळे नैराश्येत होतो”

Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
kumar vishwas
कुमार विश्वास यांनी सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय विवाहावर केली टिप्पणी; काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या…
Allu Arjun rejects Telangana CM claim
महिलेच्या मृत्यूनंतरही अल्लू अर्जुन थिएटरमध्ये थांबला, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा दावा; अभिनेता म्हणाला, “मी इतका…”
Tarak Mehta Fame Mandar Chandwadkar Wife
‘तारक मेहता…’ फेम आत्माराम भिडेच्या पत्नीला पाहिलंत का? ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत साकारतेय भूमिका, म्हणाली…
Namrata sambherao
“खूपच अभिमान वाटतो”, अभिनेत्री नम्रता संभेरावने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘या’ सहकलाकाराचे केले कौतुक
Vanita Kharat
“माझा एक बॉयफ्रेंड होता…”, वनिता खरात ९०च्या दशकातील आवडत्या गाण्याचा किस्सा सांगत म्हणाली…

मीरा जोशीने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव नेहुल वारुळे असे आहे. नेहुला हा अभिनेता आणि उत्तम कोरिओग्राफर आहे. छोट्या पडद्यावरील अनेक डान्सच्या शोसाठी त्याने कोरिओग्राफर म्हणून काम पाहिले आहे. नेहुलने मी होणार सुपरस्टार या शोमध्ये विजयीदेखील झाला होता.

हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना चिन्मय मांडलेकर करतो ‘अशी’ तयारी; पाहा पडद्यामागचा व्हिडीओ

मीराने काही दिवसांपूर्वी नेहुलसह समुद्रकिनाऱ्यावरील रोमॅंटिक फोटो शेअर केले होते. परंतु, त्यात नेहुलचा चेहरा दिसत नव्हता. त्यामुळे अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड नेमका कोण आहे? याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर मीराने नेहुलचा चेहरा दाखवत लग्नाची तारीख जाहीर केली आहे. येत्या ५ सप्टेंबरला दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत.

हेही वाचा : Video: तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचं शीर्षकगीत प्रदर्शित; गायकांचं ‘सारेगमप’शी आहे खास कनेक्शन

दरम्यान, मीरा जोशी अभिनेत्री असण्याबरोबरचं उत्तम नृत्यांगना सुद्धा आहे. ‘लाल बत्ती’, ‘युथ’, ‘शिवा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. ‘तुझं माझं ब्रेकअप’ या छोट्या पडद्यावरील मालिकेमुळे अभिनेत्री घराघरांत पोहोचली. आता मीरा तिच्या बॉयफ्रेंडचा चेहरा आणि नाव केव्हा उघड करणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Story img Loader