गेल्या आठवड्यात ‘फॅबुलस लाइव्स ऑफ बॉलीवूड वाइव्स’चं तिसरं पर्व ( Fabulous Lives of Bollywood Wives Season 3 ) नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालं. या तिसऱ्या पर्वात काही नवे चेहरे पाहायला मिळाले आहेत. यामध्ये नीलम कोठारी सोनी, महीप कपूर, भावना पांडे, सीमा सजदेह यांच्यासह रणबीर कपूरची सख्खी बहीण रिद्धिमा कपूर साहनी झळकली आहे. ‘फॅबुलस लाइव्स ऑफ बॉलीवूड वाइव्स’च्या माध्यमातून रिद्धिमाने वयाच्या ४४व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. त्यामुळे सध्या रणबीर कपूरची बहीण खूप चर्चेत आहे. पण, रिद्धिमा काय काम करते? तिचा पती कोण आहे? जाणून घ्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिद्धिमा कपूर ही ज्वेलरी डिझायनर आहे. क्लोजिंग ब्रँड रिद्धिमा सांभाळते. तिची लग्जरी स्टाइल नेहमी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असते. रिद्धिमाचं लग्न दिल्लीतील बिझनेसमन भरत साहनीशी झालं असून तेव्हापासून ती राजधानी दिल्लीत राहते.

हेही वाचा – Bigg Boss 18: अडीच कोटींच्या फ्लॅटच्या बदल्यात मुलाला भेटण्याची परवानगी अन्…; हेमा शर्मावर पूर्वाश्रमीच्या पतीने केले गंभीर आरोप

रिद्धिमा कपूर आणि भरत साहनी लग्नाआधी पाच वर्ष एकमेकांना डेट करत होते. दोघांची पहिली भेट १९९७ मध्ये लंडन येथे झाली होती. त्यानंतर चार वर्षांनंतर दोघं २००१मध्ये मुंबईत भेटले. मग दोघांचा संवाद वाढला. हळूहळू मैत्री दृढ होऊ लागली आणि रिद्धिमा-भरत एकमेकांच्या अधिक जवळ आले. त्यानंतर २००६मध्ये दोघांची लग्नगाठ बांधली गेली.

हेही वाचा- Bigg Boss 18: दोन वेळा घटस्फोट झालेल्या करणवीर मेहरावर ‘या’ अभिनेत्रीचा जीव जडला, सलमान खानला म्हणाली…

भरत साहनीचं शालेय शिक्षण दिल्लीतील मॉडर्न स्कूलमध्ये झालं; जे वसंत विहार येथे आहे. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी भरत परदेशात गेला. मग तो एक यशस्वी बिझनेसमन झाला. वेअरवेल या कौटुंबिक मालकीच्या वस्त्र निर्यात व्यवसायाचे भरत साहनी व्यवस्थाकीय संचालक आहे. माहितीनुसार, ही कंपनी वर्षाला $30 मिलियन म्हणजे २५२ कोटी रुपये कमवते. रिद्धिमा कपूरबरोबर लग्न झाल्यानंतर भरतने या कंपनीत काम करायला सुरुवात केली. त्यानंतर या कंपनीसंदर्भातील अनेक जबाबदाऱ्या त्याच्याकडे देण्यात आल्या.

हेही वाचा – Video: अभिनेता शशांक केतकरने पुन्हा अस्वच्छतेबाबत उठवला आवाज; म्हणाला, “बघू निर्लज्ज कोण आहे”

सध्या भरत साहनी, रिद्धिमा आणि मुलीबरोबर दक्षिण दिल्लीतील आलिशान घरात राहत आहे. रिद्धिमा कपूर सतत सोशल मीडियावर घराचे फोटो शेअर करत असते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meet ranbir kapoor sister riddhima kapoor husband owns a rs 252 crore company pps