Megha Dhade : प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आणि दु:ख दोन्ही असतात. या दोन्ही गोष्टींचा मेळ घालून पुढे जावे लागते. कलाराकांना करिअरमध्ये यशाच्या दिशेने वाटचाल करताना अनेकदा रिजेक्शनचा समाना करावा लागतो. काही कलाकारांना यासाठी फार जास्त स्ट्रगलही करावं लागतं. प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळे अनुभव येतात. अशात मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडेने तिच्या आयुष्यातील असाच एक अनुभव चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.

‘बिग बॉस’ मरठीचं पहिलं पर्व फार गाजलं होतं. या पर्वात अभिनेत्री मेघा धाडेने आपलं नाव ट्रॉफीवर कोरलं. मेघा धाडेने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने मिळवलेल्या यशाने आज तिचा चाहता वर्गदेखील फार मोठा आहे. मात्र, यशाची पायरी चढत असताना सुरुवातीच्या काळात मेघाला एका मालिकेतून रिजेक्ट करण्यात आलं होतं. हे रिजेक्शन तिच्या फार जिव्हारी लागलं होतं.

Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
parveen babi kabir bedi break up story
“परवीन बाबीने मला सोडलं, कारण मी तिला…”, कबीर बेदी यांचा मोठा दावा; म्हणाले…
Bigg Boss 18 Kim Kardashian, Kylie Jenner and Kendall Jenner have been approached for salman Khan show
Bigg Boss 18: अनंत अंबानीच्या लग्नानंतर जगप्रसिद्ध कार्दशियन बहिणी पुन्हा येणार भारतात, सलमान खानच्या शोमध्ये होणार सहभागी?
Marathi Actors Akshay Kelkar First Reaction after announced abeer gulal serial will off air
‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar New Time God of the House
Bigg Boss 18: विवियन डिसेनानंतर ‘टाइम गॉड’ झाली मराठी अभिनेत्री? आता ‘बिग बॉस १८’च्या घराची जबाबदारी तिच्या हातात

हेही वाचा : सुख म्हणजे नक्की काय असतं : शालिनीला अद्दल घडवणाऱ्या ‘त्या’ सीनचं ‘असं’ झालं शूटिंग; पाहा पडद्यामागचा व्हिडीओ

मेघाने काही दिवसांपूर्वी ‘राजश्री मराठी’ला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिने हा किस्सा सांगितला आहे. “आपण विविध ऑडिशन देतो तेव्हा अनेक रिजेक्शनसुद्धा वाट्याला येतात. तुझ्या आयुष्यात असं रिजेक्शन आहे का? जे अगदी तुझ्या जिव्हारी लागलं आहे.”, असा प्रश्न तिला मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता.

याला उत्तर देताना ती म्हणाली, “हो, माझी एक मालिका होती ‘नूर ए नर्गिस’ मी खूप मेहनतीने ती मालिका करत होते. त्या मालिकेचे ८ ते १० एपिसोड मी केले. त्यानंतर, त्यांनी मला काढून टाकलं. मी त्या पात्रासाठी मॅच्युअर वाटत नाही, मुख्य पात्र ताकदीने धरू शकेल अशी वाटत नाही, असं सांगून मला १० एपिसोडनंतर काढून टाकण्यात आलं, यामुळे मला फार वाईट वाटलं होतं.”

“त्यानंतर जेव्हा जेव्हा ही मालिका टीव्हीवर यायची तेव्हा मी थेट टीव्ही बंद करायचे. मी म्हणायचे, यांना कशाला टीआरपी वाढवून देऊ. थोडावेळ त्याचं वाईट वाटू द्यायचं पण, नंतर लगेच आपण आपल्या दुसऱ्या कामाला सुरुवात करायची. तुम्हाला दुसरं काम मिळतं, मग तुमच्या मनात या सर्व गोष्टींचा अजिबात विचार नाही येत.”, असं मेघाने या मुलाखतीमध्ये सांगितलं.

हेही वाचा : आता होऊ दे धिंगाणा ३ : अनिरुद्ध अन् संजनामध्ये रंगणार भन्नाट अतरंगी टास्क; कलाकारांची होणार धावपळ अन्…; पाहा प्रोमो

मुलाखतीत मेघाने पुढे दुनियादारीबद्दलसुद्धा भाष्य केलं आहे. ती म्हणाली, “या इंडस्ट्रीत खरीखुरी दुनियादारी तुम्ही रोज शिकत असता. प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणात तुम्ही काहीतरी वेगळं शिकत असता. इतकंच नाही तर, बिग बॉसच्या घरातही मी खूप काही शिकले.”