‘बिग बॉस १६’ या बहुचर्चित शोचं विजेतेपद कोण पटकावणार? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेरीस रॅपर एमसी स्टॅनने ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. शिव ठाकरे व एमसीस्टॅन हे ‘बिग बॉस’चे टॉप २ सदस्य होते. एमसी स्टॅन विजेता तर शिव उपविजेता ठरला. दोघांमध्ये ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकण्यासाठी बरीच चढाओढ पाहायला मिळाली. मराठमोळा शिव मात्र या ट्रॉफीपासून दूर राहिला.

शिवला प्रेक्षकांसह त्याच्या चाहत्यांचाही भरभरुन पाठिंबा मिळाला. मराठी कलाकारही शिवसाठी एकवटले होते. शिवला अधिकाधिक वोट करा अशी पोस्ट या कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे शेअर केली होती. मात्र शिव विजेतेपदापासून हुकला. शिवच विजेता हवा होता असं त्याचे चाहतेही म्हणत आहेत.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
Loksatta lalkilla Amit Shah statement of Congress defeat
लालकिल्ला: अमित शहांचे काँग्रेस पराभवाचे सत्यकथन!

आणखी वाचा – Bigg Boss 16 Grand Finale : ‘बिग बॉस हिंदी’ १६ व्या पर्वाच्या विजेत्याची घोषणा, पुण्याच्या एमसी स्टॅनने कोरले ट्रॉफीवर नाव

शिवला सुरुवातीपासूनच पाठिंबा देणार ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे हिने त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. मेघा सातत्याने शिवला पाठिंबा देत होती. शिवच घरी ट्रॉफी घेऊन येणार असं तिचंही म्हणणं होतं. आता शिवबरोबरचा फोटो शेअर करत तिने त्याच्यासाठी खास मॅसेज लिहिला आहे.

मेघा म्हणाली, “तू ट्रॉफी जिंकला नाहीस, पण लाखो लोकांनी मनं जिंकण्यास यशस्वी ठरलास. खूप अभिनंदन. आम्हाला तुझा अभिमान आहे”. मेघाने शिवचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. मेघाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. आपला मराठी माणूस देशाबाहेरही प्रसिद्ध झाला, खरा विजेता शिव ठाकरेच आहे, आमच्यासाठी शिव ठाकरेच विजेता आहे अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Story img Loader