मराठी कलाविश्वातील उत्तम अभिनेत्री व ‘लावणी क्वीन’ म्हणून मेघा घाडगेला ओळखलं जातं. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. सध्या मेघा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेघाने रुग्णालयातील व्हिडीओ शेअर करत सर्व नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. या व्हिडीओत अभिनेत्री आजारी असून तिच्यावर उपचार चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. मेघा व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिते, “बुखार! ३१st येतोय..किंग करोना परत आलाय प्लीज काळजी घ्या! मित्र-मैत्रिणींनो २०२४ या वर्षांत तुम्हाला सुख, समृद्धी लाभो आणि भरभरून यश मिळो!”

हेही वाचा : Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या चाहत्यांना ३१ डिसेंबरला मिळणार खास सरप्राईज, काय ते जाणून घ्या…

मेघा गेले काही दिवस आजारी असल्याचं तिच्या सोशल मीडिया पोस्ट पाहून लक्षात येत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने तिचा वाढदिवस देखील रुग्णालयातच साजरा केला होता. तिने शेअर केलेले फोटो-व्हिडीओ पाहून मराठी कलाविश्वातील कलाकार व तिच्या चाहत्यांनी अभिनेत्रीची विचारपूस केली आहे.

हेही वाचा : आजोबांच्या धाकामुळे माधुरी दीक्षितने शेणाने सारवलेलं अंगण; कोकणातील आठवणी सांगत म्हणाली, “आमच्या गावी…”

अभिनेत्रीने मेघना एरंडेने तिच्या व्हिडीओवर “काळजी घे” अशी कमेंट केली आहे. याशिवाय मेघाच्या अनेक चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. यातील काही नेटकऱ्यांच्या कमेंटला उत्तर देत मेघाने आता तब्येत बरी असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, मेघाच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. मेघाने नेहमीच तिच्या दमदार नृत्यशैलीने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. म्हणूनच तिला लावणी क्वीन असंही म्हटलं जातं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Megha ghadge admitted in hospital and expressed concern about corona variant sva 00