लक्ष्मी निवास(Lakshmi Niwas) ही मालिका काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत अनेक गोष्टी घडताना दिसतात. मुलींची लग्न थाटामाटात करण्याचं व घर बांधण्याचं स्वप्न घेऊन लक्ष्मी व श्रीनिवास ही पात्रे काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. या मालिकेत अक्षया देवधर, हर्षदा खानविलकर, तुषार दळवी, दिव्या पुगावकर, निखिल राजशिर्के अशी लोकप्रिय कलाकार मंडळी या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. आता मालिकेत आणखी एक नवीन एन्ट्री झाली आहे.
लक्ष्मी निवास मालिकेत ‘या’ अभिनेत्याची एन्ट्री
लक्ष्मी व श्रीनिवास यांची धाकटी मुलगी जान्हवीच्या कॉलेजमध्ये एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात जान्हवी पाहुण्यांचा परिचय करून देणार असते. तसेच ती गाणेही सादर करणार असते. कॉलेजसमोर लावलेल्या कटआऊटकडे बघत प्रमुख पाहुणे असलेला हा व्यक्ती कोण असेल, याचा अंदाज ती बांधते. स्वत:शीच बडबडत ती त्याचा मित्राचा हात धरते. मात्र, त्यानंतर लगेचच तिला तो मित्र नसल्याची त्याला जाणीव होते. ज्या व्यक्तीचे कटआऊट पाहून ती अंदाज बांधत असते, तोच व्यक्ती समोर असल्याची तिला जाणीव होते. जान्हवीच्या कार्यक्रमात आलेला हा व्यक्ती म्हणजे अभिनेता मेघन जाधव आहे. या मालिकेत मेघनने जयंत हे पात्र साकारले आहे.
जयंत हा अत्यंत श्रीमंत असल्याचे पाहायला मिळत आहे.लहानपणी आई-वडील गेल्यानंतर त्याने स्वत:कंपनी सुरू केली व मेहनतीने यशस्वी झाला. आता जान्हवी त्याला आवडली असल्याचे पाहायला मिळत आहेत. कार्यक्रमानंतर थेट तो जान्हवीच्या घरी आला असून त्याने तिच्या आई-वडिलांक़डे म्हणजेच लक्ष्मी-श्रीनिवासकडे जान्हवीसाठी लग्नाची मागणी घातली आहे. लक्ष्मी व श्रीनिवासने त्याच्याकडे वेळ मागितला असून विचार करून कळवतो असे सांगितले आहे.
मेघन जाधवबद्दल बोलायचे तर त्याने रंग माझा वेगळा मालिकेत काम केले होते. अनेक मराठी-हिंदी मालिकेत काम केले आहे. आता लक्ष्मी निवास मालिकेतून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भावनाचे लग्न ठरले होते. श्रीकांत व भावनाच्या लग्नासाठी सगळे उत्सुक असल्याचे दिसत होते. मात्र, लग्नादिवशीच श्रीकांत व त्याच्या कुटुंबाचा अपघात झाला. त्यामध्येच त्याचे निधन झाले आहे. त्यामुळे आनंदीची जबाबदारी भावनाने घेतली. आता पुन्हा एकदा लक्ष्मी व श्रीनिवासला तिच्या लग्नाची काळजी लागल्याचे दिसत आहे.