Maharashtrachi HasyaJatra : सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने आजवर अनेक रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. जगभरात या कार्यक्रमाची चर्चा आहे. भारताबाहेरही या कार्यक्रमाचे अनेक प्रेक्षक आहेत. अशात आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शेट लंडनमध्ये पाहता येणार आहे. अभिनेते समीर चौघुले यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
समीर चौघुले आणि त्यांच्या विनोदाचे लाखो चाहते आहेत. त्यांना विनोदाचे अगदी अचूक टायमिंग साधता येते. नुकतेच समीर चौघुले यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम थेट लंडनमध्ये पाहता येणार, अशी माहिती देण्यात आली आहे. समीर चौघुले यांनी याचे एक पोस्टर शेअर केले आहे. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टवरून लंडनमध्ये हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार, असे समजत आहे.
हेही वाचा : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहने भाड्याने दिलं आपलं आलिशान घर, एका महिन्याचं भाडं तब्बल…; किंमत ऐकून व्हाल थक्क
तिकीट कधी अन् कुठे बुक करायचं?
लंडनमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम दोन दिवस लाईव्ह पाहता येणार आहे. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता बेक थिएटरमध्ये पहिला शो होणार आहे. तर, २४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १.३० वाजता, शॉ थिएटर, सेंट्रल लंडन येथे दुसरा शो पहाता येणार आहे. या दोन्ही शोसाठी मर्यादीत बुकिंग होणार आहेत.
बेक थिएटरमधील शो आणि शॉ थिएटरमधील शो पाहण्यासाठी तिकीट बुक कसे करायचे याची माहिती समीर चौघुले यांनी त्यांच्या पोस्टमध्ये दिली आहे. तेथे तिकीट बुकिंगची संकेतस्थळेही देण्यात आली आहेत.
समीर चौघुले यांनी शेअर केलेल्या पोस्टरवर त्यांच्या फोटोबरोब नम्रता संभेराव, प्रभाकर मोरे, चेतना भट आणि प्रथमेश शिवलकर या कलाकारांचे फोटो आहेत. त्यामुळे लंडनमध्ये यांच्या विनोदाने सर्वांना पोटदुखेपर्यंत हसता येणार एवढं नक्की. लंडनमध्ये होणाऱ्या शोमध्ये ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’तील आणखी कोणते कलाकार असणार आहेत त्याची माहिती अद्याप समजलेली नाही.
हेही वाचा : शाहरुख आणि सलमानच्या ‘त्या’ प्रँकमुळे घाबरले होते सेटवरचे लोक; ‘करण अर्जुन’ चित्रपटाच्या सेटवर काय घडलेलं? दिग्दर्शक म्हणाले
u
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने आजवर लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यामध्ये समीर चौघुले यांनी आजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत. कधी शिवालीचे बाबा, शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षक तर कधी गाण कुमार पोपट सुमारीया चौघुल्या अशी विनोदी पात्रे त्यांनी साकारली आहेत. यातील शिवालीच्या बाबांची भूमिका अनेकांच्या आवडीची आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये नम्रता संभेराव, प्रभाकर मोरे, चेतना भट यांच्याबरोबरच अन्य सर्वच कलाकारांची स्वत:ची एक वेगळी ओळख आहे. हे सर्व कलाकार आपल्या अभिनयाला आणि विनोदाला पूर्णपणे न्याय देतात.