Milind Gawali Post : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्ध म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी यांनी नुकतंच नवं घर घेतलं. ठाण्यातील त्यांच्या नव्या घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामुळे मिलिंद गवळी चांगलेच चर्चेत आले होते. अशातच मिलिंद जुन्या आठवणीत भारावून गेल्याचे पाहायला मिळाले. त्याची एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

अभिनेते मिलिंद गवळी ( Milind Gawali ) यांनी जुने फोटो आणि व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “अण्णा देशपांडे हे साताऱ्यामध्ये राहणारे, मुंबईला मला भेटायला आले, मला म्हणाले की, मी काही तुमचे सिनेमे कधी पाहिले नाही, पण अनुप जगदाळे जे यात्रेमध्ये टुरिंग टॉकीज चालवतात त्यांनी मला सांगितलं की या मुलाला तुम्ही सिनेमांमध्ये घ्या. त्यांनी तुमचे ‘सून लाडकी सासरची’ आणि ‘मराठा बटालियन’ हे दोन सिनेमे तुफान चालवले होते. अण्णा मला म्हणाले की, खरंतर या सिनेमांमध्ये मी या भूमिकेसाठी सयाजी शिंदे यांनाच घेणार होतो. पण ते दक्षिण सिनेमांमध्ये व्यग्र झाल्यामुळे मला दुसरा कलाकार घ्यायचा आहे. मला असं वाटतं तुम्ही हा चित्रपट करावा. कारण हा चित्रपट खूप चालणार आहे. म्हटलं, ‘तुम्ही इतकं खात्रीपूर्वक कसं काय सांगू शकता.’ तर ते म्हणाले, ‘हा विषयच असा आहे, ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ ही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातली व्यथा आहे. महाराष्ट्रात भावा-भावांच्या भांडणांमध्ये जमिनीचे छोटे छोटे तुकडे झाले आहेत. महाराष्ट्रामध्ये खूप कमी अशी घरं आहेत जिथे भाऊ भाऊ गुण्यागोविंदाने नांदत असतात. त्यामुळे हा चित्रपट चालेलच. कारण हा प्रत्येक घराची व्यथा सांगतो.”

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
pune video : 80 years old lady selling panipuri
पुण्यातील ८० वर्षांची आज्जी विकते पाणी पुरी, Viral Video एकदा पाहाच
dance in kolhapur on marathi song halagi tune
“एकदा वय निघून गेलं की हा आनंद नाही” हलगीच्या तालावर मित्रांनी धरला ठेका; VIDEO पाहून म्हणाल नादच खुळा…
Milind Gawali

पुढे मिलिंद ( Milind Gawali ) यांनी लिहिलं आहे, “‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ इतका चालला की त्यानंतर या सिनेमामुळे मला जवळजवळ ४० एक सिनेमे तरी मिळाले असतील. जी जी राज वासवानी नावाचे सिनेमा वितरक होते, त्यांनी मला हा ग्रामीण भाग दाखवला. माझ्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी, मी त्यांच्या बरोबर महाराष्ट्राची यात्रानीयात्रा पिंजून काढली. ग्रामीण भागातल्या प्रेक्षकांनी माझ्याकडून लाखो सह्या घेतल्या असतील. आपल्याला लोकांनी स्वीकारलं आहे याची मला जाणीव झाली. एका कलाकारावर जितकं प्रेम ग्रामीण प्रेक्षक करू शकता तितकं प्रेम शहरी प्रेक्षक करू शकत नाही असं मला वाटतं. कारण शहरी प्रेक्षकांना हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांनी त्यांच्या कलाकारांनी भुरळ घातलेली आहे.”

हेही वाचा – ‘नवरा माझा नवसाचा २’मधील पहिलं गाणं कधी येणार? सचिन पिळगांवकरांनी गायकाबरोबरचा फोटो शेअर करत दिली माहिती

मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो – मिलिंद गवळी

“त्या काळामध्ये ग्रामीण महिलांना यात्रेला सिनेमा हेच एक करमणुकीचा साधन होतं. बैलगाडीतून यायचं देवदर्शन करायचं आणि एखादा छान अध्यात्मिक सिनेमा बघायचा. लहान मुलांना गोड गोड रेवड्या, मग लक्ष्मण झुल्यामध्ये बसवायचं आणि मग परत आपल्या गावाकडे निघून जायचं. बघितलेला सिनेमा जर ‘माहेरची साडी’ सारखा असेल तर मग त्या सिनेमातल्या अलकाताईंना आयुष्यभर मनामध्ये जागा द्यायची. मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो की मला या सिनेमांमध्ये कामं करायला मिळाली, आज ‘आई कुठे काय करते’ ही मालिका करत असताना ते सगळे प्रेक्षक ज्यांनी माझे ते ग्रामीण सिनेमा बघितलेले होते त्या प्रेक्षकांचं वेगळेच प्रेम माझ्यावर आहे असं मला सतत जाणवत असतं. (मागे लावलं गाणं जितेंद्र जोशीने गायलं आहे ‘आई तुझा आशिर्वाद’),” असं अभिनेते मिलिंद गवळी ( Milind Gawali ) यांनी लिहिलं आहे.

हेही वाचा – Bigg Boss Marathi : “हिल हिल पोरी हिला…”, दादा कोंडकेंच्या गाण्यावर निक्की तांबोळी व अरबाज पटेलचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

दरम्यान, मिलिंद गवळी ( Milind Gawali ) यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी बऱ्याच मराठीसह हिंदी चित्रपटात काम केलं आहे. शिवाय ते अनेक हिंदी मालिकेही झळकले आहेत. सध्या त्यांची ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनिरुद्ध ही भूमिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतं आहे.

Story img Loader