छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ मुळे अभिनेते मिलिंद गवळी घराघरांत लोकप्रिय झाले. या मालिकेत त्यांनी अनिरुद्ध देशमुख ही भूमिका साकारली आहे. अभिनयाव्यतिरिक्त ते नेहमीच विविध विषयांवर आपलं मत मांडत असतात. नुकतेच ते त्यांच्या श्वानाबरोबर लोहगडावर गेले होते. या ट्रेकिंगचा सुंदर व्हिडीओ मिलिंद गवळींनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

मिलिंद गवळी यांनी शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत खास मुंबई-पुण्यापासून जवळ असणाऱ्या लोहगडाला भेट दिली. लोहगडावर ट्रेक करताना त्यांच्या मनात विविध विचार येऊ लागले. आपले हे विचार त्यांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. लोहगडाच्या ट्रेकचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. अभिनेते या पोस्टमध्ये नेमकं काय म्हणत आहेत जाणून घेऊया…

Sai Pallavi reacts on turning vegetarian for Sita role in Ramayana
‘रामायण’ सिनेमासाठी मांसाहार सोडल्याचे वृत्त पाहून भडकली साई पल्लवी; कायदेशीर कारवाईचा इशारा देत म्हणाली…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”

हेही वाचा : “सडेतोड बोलणारा आणि वागणारा हा माणूस…”, मनोज जरांगे पाटलांच्या साताऱ्यातील सभेबद्दल किरण मानेंची पोस्ट; म्हणाले…

मिलिंद गवळी यांची पोस्ट

“लोहगड”
परवा हा गड चढायचा योग आला
खूप छान वाटलं, आपल्याला गड चढता येतो याचं एक वेगळं समाधान असतं. उंच डोंगर चढणं काय साधी गोष्ट नसते, आपण जेव्हा गड चढतो तेव्हा आपल्याला धाप लागत असते. काही लोक थांबत थांबत चढतात, तर काहींचा स्टॅमिना चांगला असतो. ते एका दमात गड चढायचा प्रयत्न करतात. दररोज व्यायाम म्हणून गड चढणारे लोक पण आहेत.

एकदा का आपण गडावर पोचलो की एक वेगळं समाधान मिळतं, वेगळीच शांती मिळते. माझ्याबरोबर “ Zen “आमचा कुत्रा होता. तो एका दमात वरती धावत सुटला. त्याचा स्टॅमिना बघून मला त्याचा हेवा वाटला. असं वाटलं की, आपल्यामध्ये सुद्धा अशी ताकद असायला हवी. वरती पोहोचल्यावर डोक्यामध्ये असंख्य विचार येत होते. ते विचार असे होते की, जर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मुलांना शिकवायचा असेल तर तो वर्गामध्ये बसून न शिकवता जर आपण गडावरच मुलांना घेऊन गेलो आणि तिथे त्यांना इतिहास शिकवला, तर तो त्यांच्या कायमस्वरूपी मनामध्ये घर करून बसेल. तसेच महाराजांचे विचार त्यांच्यापर्यंत खूप छान पद्धतीने पोचतील.

जसं रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतनची स्थापना केली, एक वेगळी शिक्षण पद्धती तयार केली तशीच आपण का नाही तयार करू शकत,
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, राजमाची, विसापूर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, चंद्रगड, सुरगड, घोसाळगड, कडासरी, रायगड, तोरणा, राजगड, सिंहगड आणि विशाळगड. या सगळ्या गडांवर/ किल्ल्यांवर जर मुलांसाठी शाळा सुरू केल्या आणि तिथे त्यांना इतिहास शिकवला, तर मला नाही वाटत की या जन्मात ती मुलं कधी आपला महान इतिहास विसरतील. आताच्या आळशी इंटरनेट शिक्षण पद्धतीतून त्यांना बाहेर काढायचे असेल तर त्यांना गड चढायला लावणे आणि गडावर इतिहास शिकवणे हा एक छान पर्याय मला सुचतो आहे.

हेही वाचा : ‘आई कुठे काय करते’ फेम अरुंधतीचा नवीन लूक चर्चेत, अभिनेत्रीचा नवा हेअर कट पाहून सुकन्या मोनेंची खास कमेंट…

दरम्यान, मिलिंद गवळींच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ते ‘आई कुठे काय करते’ मालिकेत झळकत आहेत. अरुंधती आणि देशमुख कुटुंबाला सतत त्रास देणाऱ्या अनिरुद्ध देशमुखची व्यक्तिरेखा ते साकारत आहेत. रंजक कथानकामुळे ही मालिका नेहमीच टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या टॉप ५ मध्ये असते.

Story img Loader