‘अशी ही बनवाबनवी’, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’, ‘गंमत जंमत’, ‘एक डाव भुताचा’, ‘नवरा माझा नवसाचा, ‘धूम धडाका’, ‘भूताचा भाऊ’ अशा अनेक चित्रपटांतून अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. काही हिंदी चित्रपटांमध्येही ते अभिनय करताना दिसले. चित्रपट, नाटक व मालिका अशा सर्व माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अशोक सराफ यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. आता या निमित्ताने अभिनेते मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करीत अशोक सराफ यांचे अभिनंदन केले आहे.

आमच्या अशोक मामांना…

मिलिंद गवळी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अशोक सराफ यांच्याबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करीत त्यांनी लिहिले, “पद्मश्री अशोक सराफ, हे ऐकायला किती छान वाटतं. आपल्या माणसाला ‘पद्मश्री’ मिळाला याचा किती आनंद वाटतो. आमच्या अशोक मामांना ‘पद्मश्री’मिळाला याबद्दल मला खूपच आनंद झाला आहे. अनेक वर्षांपासून अनेक चित्रपटांमध्ये मी अशोक मामांबरोबर काम केलं असल्यामुळे ही ‘पद्मश्री’ जी पदवी त्यांना देण्यात आली, त्या पदवीसाठी ते किती पात्र आहेत, हे मला माहिती आहे. त्यांना पद्मश्री मिळायलाच हवा होता, जो त्यांना मिळाला, मला खूपच आनंद झाला.”

Ajit pawar gives Sharad Pawar Health Update
Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अजित पवारांची महत्त्वाची माहिती; म्हणाले, “त्यादिवशीच त्यांना…”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Minor boy arrested for killing infant G
१५ वर्षांचा प्रियकर, २२ वर्षांची प्रेयसी; चार महिन्यांचे बाळ आणि माणुसकीला काळीमा फासणारा गुन्हा…
Saif ali khan medicl clm
Saif Ali Khan : सैफला उपचारांसाठी ४ तासांत २५ लाखांची मंजुरी कशी मिळाली? विमा कंपनीच्या तत्परतेमुळे चर्चांना उधाण; AMC कडून तक्रार
marathi actor shares his opinion on chhaava movie
“लहान तोंडी मोठा घास, पण…”, ‘छावा’चा ट्रेलर पाहून मराठी अभिनेत्याने व्यक्त केली ‘ती’ खंत; विकी कौशलबद्दल म्हणाला…
Sanjay Mone
“आमचे मोने बाबा…”, मयुरी देशमुख ज्येष्ठ अभिनेते संजय मोनेंबाबत म्हणाली, “मोठ्या लोकांचा मोठेपणा…”
udayanraje Bhosle called chhava director laxman utekar
‘छावा’तील ‘ती’ दृश्ये बदलणार? उदयनराजेंनी थेट फोन केल्यावर दिग्दर्शक म्हणाले, “चित्रपटामध्ये फक्त आपले राजे…”
Manohar Joshi Ashok Saraf
Padma Awards 2025 : महाराष्ट्रातील १४ दिग्गजांना पद्म पुरस्कार, वाचा संपूर्ण यादी

“मी अशोक मामांबरोबर काम करायला सुरुवात केली, त्याच्या २५ किंवा ३० वर्ष आधीपासूनच त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली होती. मी त्यांच्याबरोबर पहिला चित्रपट ‘सून लाडकी सासरची’केला तेव्हाच ते सुपरस्टार होते. त्यानंतर पुढे सात सिनेमांमध्ये मला त्यांच्याबरोबर काम करायचा योग आला. त्यांच्याबरोबर काम करण्याच्या माझ्या प्रवासामध्ये मी त्यांच्याकडून खूप शिकलो. त्यांचा एक उत्तम गुण म्हणजे कामाशी प्रामाणिक राहणे. अशोक मामांना मी सातत्याने त्यांच्या कामाविषयी आस्था, त्यांच्या भूमिकेचा त्यांचा पूर्वाभ्यास, वक्तशीरपणा आणि भरभरून प्रतिभा हे मी सातत्याने बघत आलोय. आमच्या सिनेमांमध्ये इतरही दिग्गज अनुभवी मोठे कलाकार असायचे, पण वर्षानुवर्ष काम करून त्यांच्यातली कामाविषयी आवड निघून गेल्याचं जाणवायचं आणि एका बाजूला अशोक मामा ३५-४० वर्ष सातत्याने काम करूनसुद्धा कामाविषयीची त्यांची आस्था आणि त्यांचं नवोदित कलाकारासारखी आवड, ऊर्जा बघून अचंबित व्हायला व्हायचं.”

“एखाद्या दिग्दर्शकाचं किंवा एखाद्या कलाकारचा प्रासंगिक दृष्टिकोन बघून अशोक मामांचा संताप व्हायचा. त्या कारणासाठी मी त्यांची बऱ्याच वेळा चिडचिडसुद्धा पाहिली आहे. त्यांचं म्हणणं असायचं की, जर प्रामाणिक सिनेमा करायचा नसेल तर मग करताच कशाला सिनेमा? का माझा आणि सगळ्यांचा वेळ फुकट घालवताय? आणि प्रेक्षकांच्यासुद्धा डोक्याला का ताप देताय? सिनेमा करायचा असेल तर तो प्रामाणिकपणेच केला पाहिजे, असं त्यांचं सतत म्हणणं असायचं.”

“खरंच, म्हणूनच ते एक वेगळे कलाकार आहेत आणि कदाचित म्हणूनच इतक्या वर्षांनंतर त्यांच्या या प्रामाणिक कामाचं कौतुक म्हणून त्यांना ‘पद्मश्री’ देण्यात आलाय. मी स्वतःला भाग्यवान समजतो की पद्मश्री अशोकराव सराफ यांच्याबरोबर मला काम करायची संधी मिळाली. अशोक मामा तुमचं खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा”, असे लिहित मिलिंद गवळींनी अशोक सराफ यांच्याबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

दरम्यान, अशोक सराफ सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अशोक मा. मा.’ या मालिकेत मुख्य भूमिकेत काम करत आहेत. ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. मिलिंद गवळी यांच्या कामाबद्दल बोलायचे तर ते नुकतेच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनिरुद्ध या भूमिकेत दिसले होते.

Story img Loader