सिद्धार्थ जाधव सूत्रसंचालन करत असलेला ‘आता होऊ दे धिंगाणा’ हा शो प्रेक्षकांचा लाडका आहे. याचे कारण म्हणजे मालिकेत दिसणारे कलाकार या मंचावर मजा-मस्ती करताना दिसतात. स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिकेतील कलाकार या मंचावर हजेरी लावताना दिसतात. नुकताच या कार्यक्रमाचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये ‘ठरलं तर मग’ व ‘आई कुठे काय करते’ या दोन लोकप्रिय मालिकेच्या कलाकारांनी कार्यक्रमात हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे. या मंचावर प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गवळी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

मिलिंद गवळी झाले भावुक

‘स्टार प्रवाह’ वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील कलाकार हे आता ‘होऊ दे धिंगाणा’च्या मंचावर एकत्र दिसत आहेत. त्यावेळी एक मोठा फुलांचा हार दिसत आहे. याचवेळी सिद्धार्थ जाधव म्हणतो, “आई कुठे काय करते या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.” यानंतर एका महिला प्रेक्षकाने या मालिकेविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटले, “आई कुठे ही मालिका पाच वर्षे आम्ही सातत्याने बघतोय.” त्यानंतर मालिकेतील कलाकार भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मधुराणी प्रभुलकर थँक्यू म्हणताना दिसत आहे. यावेळी तिच्या डोळ्यात पाणी तरळल्याचे पाहायला मिळाले, तर मिलिंद गवळीसुद्धा त्यांच्या भावना व्यक्त करताना भावूक झाले. त्यांनी म्हटले, “खूप वर्षे या क्षणासाठी प्रामाणिक काम करत होतो, हे क्षण बघायला आई नाहीये.” त्यांच्या या बोलण्यानंतर त्यांच्यासह मंचावरील सर्व कलाकार भावुक झाल्याचे दिसले.

Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क
Shiva
Video : “मी आता अंधाराला…”, आशू-शिवामधील गैरसमज दूर करण्यासाठी पाना गँगची युक्ती; पाहा प्रोमो
Premachi Gosta
Video: ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये मुक्ता टाकीत बुडतानाचा सीन ‘असा’ झाला शूट; पाहा व्हिडीओ
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “मी शब्दांत शूर, पण सुरात असूर”, मुख्यमंत्र्यांच्या विधानाने हशा; म्हणाले, “लोकांचा गैरसमज होतो की…”
monali thakur leave the live concert
Video : प्रसिद्ध गायिकेने ‘या’ कारणामुळे अर्ध्यावर सोडला वाराणसीमधील कॉन्सर्ट, चाहत्यांची माफी मागत म्हणाली; “बेजबाबदार लोकांवर…”
punha kartvya aahe
Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो
इन्स्टाग्राम

‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकांपैकी एक आहे. मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांना भुरळ घातल्याचे पाहायला मिळाले. अरुंधती, अनिरुद्ध, संजना यांच्यासह आई, आप्पा, यश, अभिषेक, ईशा, अनघा, आरोही, विमल, गौरी अशा सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांचे मने जिंकून घेतले. प्रत्येक पात्राने त्याची वेगळी गोष्ट मांडली व ती प्रेक्षकांना भावली. मग आईसाठी काही करणारा यश असो किंवा थोडा अल्लडपणा करत चुका करणारी ईशा असो, सुनेला कायम साथ देणारे अप्पा असो किंवा मुलगा कितीही चुकला तरी त्याची काळजी वाटणाऱ्या कांचन आजी असो, अशा सर्वच पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

हेही वाचा: शुभमंगल सावधान! लोकप्रिय अभिनेत्याने अभिनेत्री पूजा जोशीशी बांधली लग्नगाठ, थाटामाटात पार पडला सोहळा

दरम्यान, गेल्या पाच वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आता या मालिकेनंतर कलाकार कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader