‘पारू'(Paaru) या मालिकेत सध्या अनपेक्षित गोष्टी घडताना दिसत आहेत, त्यामुळे मालिकेत सतत नवीन वळण येत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनुष्कामुळे सध्या तणावाचे वातावरण मालिकेत पाहायला मिळत आहे. आता तिच्यामुळे आदित्य व अहिल्यादेवी यांच्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता वाढली असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आई-मुलाच्या नात्यात होणार गैरसमज

झी मराठी वाहिनीने ‘पारू’ मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला पारू घराच्या बाहेर उभी असलेली दिसते. ती काळजीत असलेली दिसत आहे. आदित्य तिला विचारतो, “काय झालं पारू?” ती म्हणते, “आदित्य सर, का गेला होता? माहितेय अनुष्का मॅडम लय चांगल्या आहेत, म्हणून तुम्ही तुमच्या आईची बाजू घ्यायची सोडून त्यांची बाजू घ्यायची गरज होती तुम्हाला?” याच प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, किर्लोस्कर घरातील सर्व जण जेवणासाठी बसले आहेत. आदित्य अहिल्यादेवीला म्हणतो, “आई मला माहितेय की तू माझ्यावर रागावली आहेस, कारण मी अनुष्काला भेटायला गेलो होतो. विश्वास ठेव, माझा तुला दुखवायचा हेतू नव्हता.” तितक्यात अनुष्का येते आणि म्हणते, “तो मला भेटायला आला होता.” तिच्या अचानक येण्याने व असे बोलण्याने सर्वांच्या चेहऱ्यावर धक्का बसल्याचे भाव पाहायला मिळत आहेत.

इन्स्टाग्राम

‘पारू’ मालिकेचा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “अनुष्कामुळे होणार का अहिल्या आणि आदित्यमध्ये गैरसमज?”, असे कॅप्शन दिले आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, काही दिवसांपूर्वीच अनुष्का किर्लोस्करांच्या आयुष्यात आली आहे. अहिल्यादेवीसारखीच तडफदार, यशस्वी, धाडसी, निर्णयक्षमता असलेली, सुंदर, संकटांना सामोरी जाण्याची हिंमत असलेली अशी अनुष्का आहे. महत्त्वाचे म्हणजे ती अहिल्यादेवी किर्लोस्करला प्रेरणास्थान मानते. काही दिवसांपासून आदित्यसाठी मुलगी पाहणे सुरू आहे. जेव्हा किर्लोस्कर घरातील सर्वांना अनुष्का भेटली तेव्हा सर्व कुटुंबीयांना अनुष्का आदित्यसाठी योग्य असल्याचे वाटले. अहिल्यादेवीच्या बिझनेसमध्ये ती एका प्रोजेक्टमध्ये पार्टनरदेखील झाली. आदित्य, प्रिया, प्रितम यांच्याबरोबर तिची चांगली मैत्रीदेखील झाली. मात्र, तिने जेव्हा अहिल्यादेवीसमोर पारूला तू तुझं टॅलेंट इथे घरकाम करण्यात वाया घालवत आहेस असे सांगितले, तेव्हा अहिल्यादेवीला राग आला. तेव्हापासून त्यांच्यात वैर सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अहिल्यादेवीने तिला प्रोजेक्टमधून काढून टाकले. तिच्या ऑफिसवर इन्कम टॅक्सची धाड पडेल याची व्यवस्था केली. याबरोबरच तिला पूर्ण उद्ध्वस्त करेन असेही म्हटले. या सगळ्यात अहिल्या अनुष्काबरोबर चुकीचे करत आहे, तिच्यावर अन्याय होतोय असे सर्वांना वाटत आहे, ज्यामध्ये तिच्या मुलांचाही समावेश आहे.

हेही वाचा: “पहिल्या चित्रपटानंतर मी बेरोजगार…”, अल्लू अर्जुनचं वक्तव्य; ‘या’ दिग्दर्शकाला दिलं करिअर वाचवण्याचं श्रेय

दरम्यान, आता मालिकेत पुढे नेमकं काय होणार, अहिल्यादेवी खरंच अनुष्कावर नाराज आहे की ती तिची परीक्षा घेत आहे, अहिल्यादेवी व आदित्य यांच्यामध्ये दुरावा निर्माण होणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Misunderstanding between aaditya and ahilyadevi because of anushka watch paaru marathi serial promo nsp