सध्या देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सामान्य माणसापासून कलाकारांपर्यंत प्रत्येकजण आनंदाने दिवाळी साजरी करताना दिसत आहे. दिवाळी म्हटलं की, फराळ आणि भेटवस्तू आल्याच. कुटुंबातील सदस्यांना तसेच मित्रपरिवाराला भेटवस्तू देत दिवाळीचा आनंद द्विगुणित केला जातो. अनेक कलाकार आणि राजकीय नेतेही एकमेकांना भेटवस्तू देतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेत्री विशाखा सुभेदारला दिवाळीनिमित्त खास भेट पाठवली आहे.

हेही वाचा- Video : “किती भारी वाटलं!”, अमिताभ बच्चन यांनी प्राजक्ता माळीला थेट लावला व्हिडीओ कॉल, कारण होतं खूपच खास…

राज ठाकरे दरवर्षी जवळच्या व्यक्तींना दिवाळीनिमित्त भेटवस्तू पाठवत असतात. यावर्षी राज ठाकरेंनी अभिनेत्री विशाखाला दिवाळीची भेट पाठवली आहे. या दिवाळी भेटमध्ये फराळ, चांदीचा दिवा, मेणाचे दिवे यांचा समावेश आहे. या भेटवस्तूंबरोबर राज ठाकरे यांनी खास नोटही पाठवली आहे.

विशाखाने राज ठाकरेंकडून मिळालेल्या दिवाळी भेटचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. विशाखाने फोटो शेअर करत लिहिलं, “साहेब मनापासून धन्यवाद..! तुमची गोष्टच भारी. इतकं लक्षात ठेवून डायरेक्ट घरी फराळ पाठवला, त्याबद्दल एक मनसे कार्यकर्ती म्हणून खूप आनंद झाला.” विशाखाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

हेही वाचा- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शनी इंदलकरला नेटकऱ्याने केले आक्षेपार्ह मेसेज; स्क्रीनशॉट शेअर करत म्हणाली, “अनेक पुरुष…”

विशाखाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर चित्रपट आणि मालिकांमधून विशाखाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. विनोदाचे अचूक टायमिंग आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर विशाखाने आपली वेगळी ओळख निर्माण केली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे विशाखा घराघरांत पोहचली. सध्या विशाखा ‘शुभमंगल’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

Story img Loader