‘खुपते तिथे गुप्ते’ या बहुचर्चित शोचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अवधूत गुप्ते सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये कलाकारांसह राजकीय नेतेही हजेरी लावणार आहेत. या शोचे काही प्रोमो व्हिडीओही प्रदर्शित करण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ‘खुपते तिथे गुप्ते’ शोमध्ये हजेरी लावणार आहेत. या शोच्या दुसऱ्या सीझनमधील एक नवा प्रोमो व्हिडीओ नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. झी मराठीच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’च्या या प्रोमो व्हिडीओमध्ये राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवारांवर जोरदार फटाकेबाजी करताना दिसत आहेत.

हेही वाचा>> “मला माझी जन्मतारीख माहीत नाही”, ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडचा खुलासा, म्हणाला, “ससून रुग्णालयात…”

‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये राज ठाकरेंना अजित पवारांचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. “एकदा इलेक्शनमधून बाहेर पडल्यावर १४ आमदार निवडूण आणले. की सगळे लोक त्यांच्यापासून दूर गेलेले,” असं अजित पवार व्हिडीओत म्हणत आहेत. यावर राज ठाकरे अजित पवारांची मिमिक्री करत “ए गप रे…असं मी म्हणणार होतो,” असं उत्तर देतात. ” अजित पवार स्वत:च्या मुलाला निवडूण आणू शकले नाहीत. बारामतीत काकांनी हात बाजूला केला, तर यांचं तरी काय होईल,” असं म्हणत राज ठाकरेंनी अजित पवारांना टोला लगावला आहे.

हेही वाचा>> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घरी आणली नवी कार, सचिन तेंडुलकरशी आहे खास कनेक्शन, म्हणाला, “त्याच्या रन्सएवढे…”

‘खुपते तिथे गुप्ते’चा हा नवा प्रोमो व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. ४ जूनपासून दर रविवारी रात्री ९ वाजता हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी होणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns raj thackeray talk about ncp ajit pawar in khupte tithe gupte avdhoot gute talk show kak