छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सध्या एकाच कारणामुळे चर्चेत आहे. या मालिकेत ‘मिसेस रोशन सिंह सोढी’ ही भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवालने निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते. मात्र निर्माते असित मोदी यांनी हे आरोप फेटाळले होते. त्यानंतर आता याच मालिकेत ‘बावरी’ हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री मोनिका भदोरियाने शोचे निर्माते आणि कार्यकारी निर्मात्यांविरोधात आवाज उठवला आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोनिका भदोरियाने असित मोदी आणि शोच्या प्रॉडक्शन टीमवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मोनिका म्हणाली, जो कलाकार शो सोडतो त्याचे पैसे अडकवून ठेवले जातात. तसेच कलाकारांना खूप त्रास दिला जातो. त्यांना एकमेकांपासून अंतर ठेवण्याचा सल्ला दिला जातो आणि त्यांना सेटवर विनाकारण थांबवून घेतले जाते.

When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड

हेही वाचा- ब्रेकअपच्या अफवा ऐकून करण कुंद्रा संतापला, म्हणाला, “तेजस्वी आणि माझ्यात…”

दिशा वाकानीच्या मालिकेत पुनरागमनाबाबतही मोनिकाने मोठं वक्तव्य केलं आहे. मोनिका म्हणाली, “असितकुमार यांनी दिशाबरोबरही गैरवर्तन केलं असावं. पण तिने ते कधीच गांभीर्याने घेतलं नाही. ती म्हणायची, ‘छोडो, कोई बात नहीं’, ‘जाने दो.’ मोनिका म्हणाली की. तारक मेहताच्या अर्ध्या कलाकारांनी आधीच शो सोडला आहे आणि मला आशा आहे की, बाकीचे कलाकारही लवकरच शो सोडतील.”

‘तारक मेहता…’मध्ये दयाबेनचे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वाकानी गेली सात वर्षं मालिकेपासून लांब आहे. दिशा वाकानीने २०१७ साली प्रेग्नन्सीमुळे मालिकेतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती मालिकेत परतण्याच्या चर्चा होत होत्या. पण दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर मालिकेत पुनरागमन करणार नसल्याचे सांगत दिशा वाकानीने या चर्चांना पूर्णविराम दिला होता.

हेही वाचा- ‘शार्क टॅंक इंडिया’चा परीक्षक ठरला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणारा पहिला भारतीय व्यावसायिक, म्हणाला…

मोनिका भदोरियाव्यतिरिक्त ‘तारक मेहता…’चे माजी दिग्दर्शक मालव राझदा यांनीही जेनिफर मिस्त्री बन्सीवालला पाठिंबा दिला आहे. जेनिफर मिस्त्रीने अलीकडेच सोहेल रमानी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिने असित मोदींवरही गंभीर आरोप केले आहेत.

Story img Loader