अभिनेता शशांक केतकर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे तर कधी परखड मतांमुळे चर्चेत असतो. नुकताच शशांकने एका एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी तो गणेशोत्सवातील खटकणाऱ्या गोष्टींबद्दल स्पष्टच बोलला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – ‘जवान’नंतर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा बॉलीवूडमध्ये करणार नाही काम; दिग्दर्शक अ‍ॅटलीवर आहे नाराज

शशांक सध्या ‘मुरांबा’ या स्टार प्रवाहवरील मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. गणेशोत्सवानिमित्ताने ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२३’ हा सोहळा येत्या २४ सप्टेंबरला पाहायला मिळणार आहे. याचनिमित्ताने स्टार प्रवाहवरील कलाकर मंडळी विविध एंटरटेन्मेंट चॅनेलशी संवाद साधत आहेत. नुकताच शशांकने देखील ‘तारांगण’ या एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी त्याला विचारलं गेलं की, ‘गणोशोत्सवातील कोणती गोष्ट खटकते? म्हणजेच मिरवणुका वगैरे असो किंवा इतर गोष्टी?’

हेही वाचा – ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीनं दिली आनंदाची बातमी; म्हणाली, “तुमचा विश्वास…”

हेही वाचा – ‘कट्यार काळजात घुसली’नंतर सुबोध भावे झळकणार ‘या’ संगीतमय चित्रपटात; म्हणाला, “अखेर…”

यावर शशांक म्हणाला की, “हो नक्कीच मला गणेशोत्सवातील काही गोष्टी खटकतात. देवाने सांगितलं नाहीये की, प्रदूषण करत फिरा म्हणून. त्यामुळे मला या गोष्टी खरंच खटकतात. गेली अनेक वर्ष मी यावर अगदी परखडपणे भाष्य करतोय. खड्डे खोदून मंडप उभं करायची काही गरज नाहीये. कारण ते खड्डे नंतर बुजवले जात नाहीत. मग त्यात बाईक्स वगैरे पडतात. हे आपल्याला गणपती बाप्पा सांगत नाही, बाईकवरून पडा आणि डोक फोडून घ्या. किंवा मोठे-मोठे लाऊडस्पीकर लावा.”

हेही वाचा – Rahul Vaidya And Disha Parmar: मुलीचं नाव काय ठेवणार? राहुल वैद्य म्हणाला, “राशीनुसार…”

पुढे शशांक एक प्रसंग सांगत म्हणाला की, “गणेशोत्सवादरम्यान आमच्या सोसायटीमध्ये घडलेला एक किस्सा आहे. आमच्या सोसायटी बाहेर एक मंडळ होतं, त्यांनी खूप मोठे-मोठे स्पीकर लावले होते. या स्पीकरच्या आवाजाच्या धक्काने एका आजोबांचा घरातच मृत्यू झाला. त्यात रुग्णवाहिका आतमध्ये येऊ शकली नाही. ते आजोबा तिथल्या तिथे गेले. हा दोष कोणाचा? दोन मंडळामधील गणपती कोणाचा चांगला ही स्पर्धा थांबायला हवी.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Morambaa serial actor shashank ketkar talk about things annoy in ganeshotsav pps
Show comments