बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉय हिनं अनेक मालिका, चित्रपट व वेब सीरिजमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. ‘क्यूं की साँस भी कभी बहू थी’ या स्टार प्लस वाहिनीवरील मालिकेतून मौनीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं; तर ‘नागिन’ मालिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. ‘नागिन’ मालिकेची ऑफर येण्याआधी मौनी एका गंभीर आजारामुळे त्रस्त होती. त्याबद्दल एका मुलाखतीत तिनं खुलासा केला आहे.
‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत मौनी रॉय म्हणाली, ‘नागिन’ सुरू होण्यापूर्वी मी आयुष्याच्या अशा टप्प्यावर होती जिथे मला वाटलं होतं की, माझं आयुष्य आता संपलं आहे. इतकं काही गंभीर किंवा दु:ख नव्हतं; पण मी थोडी आजारी होते. ‘झलक दिखला जा ९’ या शोनंतर माझी एल-४ – एल-५ पाठीच्या कण्याचा त्रास झालेला आणि त्यामुळे मी सरळ उभी राहू शकत नव्हते.
मौनी पुढे म्हणाली, “माझं तेव्हा खूप वजन वाढलं होतं आणि ते वजन आरोग्यासाठी चांगलं नव्हतं. मी दिवसातून ३० गोळ्या घेत होते आणि कधी कधी इंजेक्शन्स घेत होते. माझ्या मणक्यामध्ये एपिड्युरल होतं. माझ्यासाठी तो काळ खूपच वाईट होता. मी जवळजवळ तीन महिने अंथरुणाला खिळून होते आणि तेव्हाच मला ‘नागिन’ची ऑफर आली होती.”
हेही वाचा… “लवकर लग्न करा”, भूषण प्रधान व अनुषा दांडेकरच्या ‘त्या’ फोटोवर चाहत्यांच्या कमेंट्स
एकता कपूरनं ‘नागिन’ ऑफर केल्याबद्दल मौनीनं कृतज्ञताही व्यक्त केली. तिनं नमूद केलं की, सुरुवातीला ‘नागिन’ ही मालिका तीन महिन्यांच्या कालावधीची असेल, असं नियोजन होतं. परंतु तिची लोकप्रियता आणि प्रतिसाद पाहता, निर्मात्यांनी सात महिन्यापर्यंत त्या मालिकेचा कालावधी वाढवला.
हेही वाचा… “मला पाकिस्तानकडून खूप प्रेम…”, सीमेपलीकडे होतंय संजय लीला भन्साळींच्या ‘हीरामंडी’चं कौतुक, म्हणाले…
‘नागिन’चा पहिला सीझन २०१५ ते २०१६ या काळात प्रसारित झाला होता. या मालिकेत मौनी रॉय आणि अर्जुन बिजलानी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.
दरम्यान, मौनी रॉय शेवटची ‘शोटाईम’ या वेब सीरिजमध्ये झळकली होती. डिझ्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या या वेब सीरिजमध्ये मौनी रॉयसह इमरान हाश्मी, नसिरुद्दीन शाह, महिमा मकवाना, राजीव खंडेलवाल व श्रिया सरन हे कलाकार झळकले आहेत.