अभिनेत्री शिवानी रांगोळे लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या ती ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शिवानी तिच्या कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्यातही चर्चेत असते. गेल्या वर्षी अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर शिवानीने अभिनेता विराजस कुलकर्णीशी लग्नगाठ बांधली. शिवानीचं विराज कुलकर्णीची आई अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्याशी असलेलं बॉण्डिंग सर्वांनाच माहीत आहे. आता मृणाल कुलकर्णी यांनी त्यांच्या लाडक्या सुनेच्या ऑनस्क्रीन सासूसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिवानी रांगोळे प्रमुख भूमिका साकारत असलेल्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेमध्ये अभिनेत्री कविता मेढेकर महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. आता त्या मालिकेमध्ये शिवानीच्या सासूची भूमिका बजावताना दिसणार आहेत. या मालिकेतील शिवानीच्या कामाचं आणि कविता मेढेकर यांच्या कामाचं आतापर्यंत भरभरून कौतुक झालं आहे. नुकत्याच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवानीची ऑनस्क्रीन सासू आणि ऑफस्क्रीन सासू एकमेकींना भेटल्या आणि त्या वेळेचा एक खास फोटो मृणाल कुलकर्णी यांनी पोस्ट केला आहे.

आणखी वाचा : “प्रिय शिवानी, तू आल्यापासून जाणवतंय…”; मृणाल कुलकर्णींची सूनबाईंच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

मृणाल कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रिय राहून नेहमीच त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांची शेअर करत असतात. अनेकदा त्या त्यांच्या सुनेबद्दल म्हणजेच शिवानीबद्दलही प्रेम व्यक्त करताना दिसतात. आता त्यांनी त्यांचा आणि मालिकेमध्ये शिवानीचा राग करणाऱ्या कविता मेढेकर यांचा एक फोटो शेअर करत लिहिलं, “आमच्या सुनेला जास्त त्रास देऊ नको बरं का !! नाहीतर तुला शिकवीन चांगलाच धडा !?”

हेही वाचा : “…आणि ते पाहून विराजस जेलस होतो,” मृणाल कुलकर्णींनी उघड केलं लेका-सुनेसोबतच्या नात्याबद्दलचं गुपित

मृणाल कुलकर्णी यांची ही गमतीशीर पोस्ट आता चांगली चर्चेत आली आहे. मृणाल कुलकर्णी आणि कविता मेढेकर यांच्यात असलेली मैत्री ही यानिमित्ताने चाहत्यांसमोर आली आहे. आता या पोस्टवर कमेंट करत त्यांचे चाहते ही पोस्ट आवडल्याचं सांगत आहेत.