मराठी मनोरंजन सृष्टीत नवरा-बायको प्रमाणेच काही सासू- सूनांची जोड्याही लोकप्रिय आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांची जोडी. गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांनी लग्नगाठ बांधली. मृणाल कुलकर्णी आणि शिवानी यांचं खूप खास नातं आहे. तर आता शिवानीला मिळालेल्या यशाबद्दल मृणाल कुलकर्णी यांनी खास पोस्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवानी मृणाल कुलकर्णी यांची खूप लाडकी आहे. त्या वेळोवेळी सोशल मीडियावरून सूनेचं कौतुक करत असतात. कालच ‘झी मराठी पुरस्कार’ संपन्न झाले आणि त्यात शिवानीला तीन पुरस्कार मिळाले. त्याबद्दल सोशल मीडियावरून मृणाल यांनी शिवानीचा एक फोटो पोस्ट करत तिला मिळालेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.

आणखी वाचा : शिवानी रांगोळेने सांगितला कविता मेढेकरांबरोबर काम करण्याचा अनुभव, म्हणाली, “एकत्र सीन करताना…”

झी मराठी पुरस्कार सोहळ्यात शिवानीला सर्वोत्कृष्ट नायिका, विशेष लक्षवेधी चेहरा आणि सर्वोत्कृष्ट जोडी असे तीन पुरस्कार मिळाले. त्यानंतर काल रात्री मृणाल कुलकर्णी यांनी शिवानीचा पुरस्कार स्वीकारतानाचा एक फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आणि लिहिलं, “शाब्बास सूनबाई…”

हेही वाचा : मास्तरीण बाईंचा खऱ्या आयुष्यातील स्वभाव कसा? अधिपतीने सांगूनच टाकलं, शिवानीच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर करत ऋषिकेश म्हणाला…

आता मृणाल कुलकर्णी यांच्या या सोशल मीडिया पोस्टने सर्वांच लक्ष वेधलं आहे. या त्यांच्या पोस्टवर कमेंट करत त्यांचे चाहते शिवानीला मिळालेल्या या पुरस्कारांबद्दल तिचं भरभरून कौतुक आणि तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mrinal kulkarni writes a special post for shivani rangole for receiving three awards rnv