Actress Mrinal Kulkarni : आपल्या सहजसुंदर अभिनयाने मृणाल कुलकर्णींनी कायमच रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. २००० मध्ये प्रसारित होणाऱ्या ‘सोनपरी’ या मालिकेमुळे मृणाल कुलकर्णींना घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. गेली वर्षानुवर्षे विविध टेलिव्हिजन मालिका तसेच चित्रपटांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कलाविश्वात एखाद्या प्रोजेक्टसाठी काम करायचं म्हटलं की, रात्रंदिवस मेहनत घ्यावी लागते. प्रसंगी घराकडे देखील दुर्लक्ष होतं. विशेषत: लग्न झाल्यावर महिला कलाकारांना काम करताना सगळ्या गोष्टी जमवून आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करावं लागतं. अर्थात हे सगळं मृणाल कुलकर्णींनी सुद्धा अनुभवलं. पण, या प्रवासात त्यांच्या सासूबाईंनी त्यांना भक्कम साथ दिली. आज आपल्या सासूबाईंच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर करत मृणाल कुलकर्णींनी आपल्या भावनात व्यक्त केल्या आहेत.

मृणाल कुलकर्णी यांची पोस्ट

“९० व्या वर्षात प्रसन्न पदार्पण! माझ्या सासूबाई या माझ्या आयुष्यातल्या खूप महत्त्वाची व्यक्ती… ज्यांच्या जीवनावरच्या प्रेमाने, उत्साहाने मला कायमच अचंबित केलं आहे. स्वत: एक यशस्वी स्त्रीरोग तज्ञ आणि आम्हा सर्वांना कायम भक्कम पाठिंबा देणारी ही व्यक्ती. यांच्याच आग्रहामुळे मी विराजस कुलकर्णीला ( मुलगा ) निर्धास्तपणे त्यांच्यावर सोपवून माझी कारकीर्द घडवू शकले. आज त्यांचे आशीर्वाद आम्हाला आहेत हे आमचं मोठं भाग्य! त्यांना निरोगी आणि प्रसन्न आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!” अशी पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने सासूबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मृणाल कुलकर्णींची सासूबाईंसाठी खास पोस्ट ( Mrinal Kulkarni )

दरम्यान, मृणाल कुलकर्णींच्या पोस्टवर कमेंट्स करत त्यांच्या चाहत्यांनी अभिनेत्रीच्या सासूबाईंवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच अनेकांनी सासू-सुनेच्या या सुंदर नात्याचं भरभरून कौतुक सुद्धा केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mrinal kulkarni writes special post for mother in law on the occasion of her 90 birthday sva 00